'मी लग्न केलंय त्याच्याशी...' 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट केल्यानंतर 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न?

बालिका वधू फेम आनंदी म्हणजेच अविका गौर हिने तिच्यापेक्षा 18 वर्ष मोठ्या व्यक्तीसोबत लग्न केल्याची बोलं जातंय. याबद्दल खुद्द अभिनेत्री खुलासा केलाय. 

नेहा चौधरी | Updated: Jul 21, 2024, 10:54 AM IST
'मी लग्न केलंय त्याच्याशी...' 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट केल्यानंतर 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न? title=
I got married to him Balika Vadhu fame anandi avika gor actress secretly married big actor after 18 years

Avika Gor Marriage :  'बालिका वधू' या टीव्ही शोमध्ये आनंदीच्या भूमिकेत घराघरा पोहोचलेली अविका गौर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'ससुराल सिमर का' नंतर 'उय्याला जम्पाला', 'एकादिकी पोथावु चिन्नावदा' आणि 'थँक  यू' या चित्रपटातून तिने लोकप्रियता मिळवली. पण सध्या ती प्रोफेशनल लाइफमुळे नाही तर पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. अविकाने गुपचूप लग्न केलं असं म्हटलं जातंय आणि तेही 18 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत.

अविका गौरचे गुपचूप लग्न? 

अविका गौरबद्दल अनेकदा अफवा पसरत असतात. कधी अभिनेत्री एखाद्या अभिनेत्याला डेट करतेय तर ती प्रेग्नेंट असल्याची बातमीही समोर आली होती. मात्र, अविका गौरने स्वत: प्रत्येक वेळी समोर येऊन या अफवांवर मौन सोडलंय.  अभिनेत्री सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांसोबत कायम जोडलेली असते. अलीकडेच अविका भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये दिसली होती. जिथे अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने गप्पा मारल्यात. 

पॉडकास्ट शोमध्ये जेव्हा भारती सिंहने अविकाला लग्नाबद्दल विचारलं, तेव्हा अभिनेत्री कधी आणि कोणाशी लग्न करणार आहे. यावर अविकाने उत्तर दिलं, 'मी आणि मिलिंद चंदवानी 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहोत. मिलिंद आमच्या इंडस्ट्रीतला नाही. असून त्याची एक एनजीओही आहे. आमचं नातं सुरू झालं तेव्हा सुरुवातीचे 6 महिने आम्ही फक्त फ्रेंडझोनमध्ये होतो. आम्ही आमच्या नात्यात कधीही घाई केली नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avika Gor (@avikagor)

'मी मिलिंदशी लग्न केलंय'

मिलिंद चंदवानीसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना अविका गौर पुढे म्हणाली, 'आमचा विश्वास आहे की नात्यात कधीही घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. फ्रेडझोनमध्ये 6 महिने राहिल्यानंतर मिलिंदने मला प्रपोज केलं. मिलिंद इतका छान आहे की मी माझ्या मनात त्याच्याशी लग्न केलंय. मला आज तिच्याशी लग्न करावंसं वाटतं, पण मिलिंद म्हणतो की माझ्या आणि त्याच्या वयात खूप फरक आहे. त्यामुळे मी माझा पूर्ण वेळ त्यानुसार काढला पाहिजे. यानंतरच मी लग्नाचा विचार करू.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Avika Gor (@avikagor)

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'मी माझ्या मनात मिलिंदशी लग्न केलंय.' यानंतर भारतीने विचारले, मग तू लग्न कधी करणार आहेस? यावर अभिनेत्री म्हणाली की, सध्या आम्ही एकमेकांसोबत खुश आहोत आणि लग्नाला अजून वेळ आहे. याआधी अविका गौरबद्दलही या गोष्टी समोर आल्या होत्या की, अभिनेत्री तिच्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा अभिनेता मनीष रायसिंघनला डेट करत होती. मनीषने अविकासोबत 'ससुराल सिमर का'मध्ये काम केलं होतं. मात्र, अभिनेत्रीने ही अफवा असल्याच म्हटलंय.