मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटीझ्म, वर्चस्ववादावर आवाज उठवला जातोय. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. पण सुशांतच्या फॅन्सनी सलमानविरोधात मोर्चा उघडलाय. बिहारमध्ये सलमानच्या बीईंग ह्यूमनचे आऊटलेट तोडण्यात आलंय. सलमानचे पोस्टर्स जाळण्यात येतायत. सलमानविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आलाय. दरम्यान सलमानच्या सिनेमांवर बिहारमध्ये बंदी घालण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतलाय.
सलमान खान किंवा सुशांतच्या आत्महत्येशी संबंधित कोणाचाही सिनेमा बिहारमधील पटणा शहरात लावला गेला तर त्या थिएटरसमोर आत्महदनाचा इशारा हिंदू महासभा प्रदेश उपाध्यक्ष, जेडयू नेता सम्राट यांनी म्हटलंय. सुशांत फिल्म इंडस्ट्रीमध्ये नंबर एकवर होते बिहारचे असल्यामुळे त्याला मागे ठेवलं गेलं. फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याला बॅन केलं होतं. तो नैराश्येत जावा यासाठी हालचाली सुरु होत्या असा आरोप पटनाचे वकील सुधीर कुमार झा यांनी केलायं.
सुशांत सिंहला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सलमान, करणसह पाचजणांवर ठेवण्यात आलाय. त्यामुळे यांना न्यायालयीन कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे.
वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी यासंदर्भात खटला दाखल केलाय. अभिनेत्री कंगना राणौतने व्हिडीओ बनवून सुरुवातीपासून याप्रश्नावर आवाज उठवलाय. गायक सोनू निगम यांनी देखील हे न रोखल्यास आणखी कोणी आत्महत्या होईल अशी भीती वर्तवली आहे. प्रस्थापित अभिनेते, दिग्दर्शक, प्रोडक्शन कंपन्यांविरोधात सोशल मीडियात आवाज उठवला जातोय.
'दबंग'चा दिग्दर्शक आणि अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यप याने सलमान आणि त्याच्या परिवारावर आरोप केलेयत. दरम्यान गायक सोनू निगम याने देखील सलमानवर हल्ला चढवला. दोन व्यक्तींचा संगीतक्षेत्रातही दबदबा असून कोणी काय गायचं हे ठरवलं जातं. यामुळे संगीत क्षेत्रावर परिणाम होईल. या क्षेत्रातही आत्महत्या होऊ शकते असेही सोनू निगमने स्पष्ट केले.