The Kashmir Files in IFFI : बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. चित्रपटानं अनेक विक्रम मोडले होते. दरम्यान, 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे (IFFI) ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला वल्गर आणि प्रोपोगॅंडा म्हटलं आहे. हा चित्रपट 1990 मध्ये कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली सत्य परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली. गोव्यात आयोजित 53 व्या चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी नदाव लॅपिड यांनी या चित्रपटावर वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले नदाव लॅपिड
सोमवारी झालेल्या कार्यक्रमात नदाव लॅपिड म्हणाले, 'द काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर आम्ही सगळेच अस्वस्थ झालो आणि आम्ही शॉक झालो होतो. हा चित्रपट वल्गर आणि प्रोपोगॅंडावर आधारित असल्याचे वाटते. एवढ्या मोठ्या चित्रपट महोत्सवासाठी हा चित्रपट योग्य नाही. मी माझ्या भावना उघडपणे सगळ्यांसमोर मांडत आहे कारण या कार्यक्रमात आपण टीका स्वीकारतो आणि त्यात नक्की काय चूकीचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. 'द काश्मीर फाइल्स' मुळे आम्ही सगळेच अस्वस्थ झालो. या चित्रपटामुळे सगळ्यांना धक्का बसला होता.
#Breaking: #IFFI Jury says they were “disturbed and shocked” to see #NationalFilmAward winning #KashmirFiles, “a propoganda, vulgar movie” in the competition section of a prestigious festival— organised by the Govt of India.
Over to @vivekagnihotri sir…
@nadavlapi pic.twitter.com/ove4xO8Ftr— Navdeep Yadav (@navdeepyadav321) November 28, 2022
नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाइल्सवर केलेल्या कमेंटचा व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नदाव यांना ट्रोल केलं आहे. नदाव यांनी केलेल्या या कॉमेन्टचा नेटकरी विरोध करत आहेत. चित्रपट निर्माते अशोक पंडित (ashok pandit) यांनीही नदाव यांनी केलेल्या कमेन्टचा विरोध करत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये ते म्हणाले, 'द काश्मीर फाइल्सबाबत नदाव लॅपिड यांनी वापरलेल्या या भाषेचा मी विरोध करतोय. 3 लाख कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय दाखवणं हे अश्लील म्हणता येणार नाही. मी, एक चित्रपट निर्माता आणि कश्मीरी पंडित असल्याने या चुकीट्या कमेंटच्या विरोधात आहे.'
झूट का क़द कितना भी ऊँचा क्यों ना हो..
सत्य के मुक़ाबले में हमेशा छोटा ही होता है.. pic.twitter.com/OfOiFgkKtD— Anupam Kher (@AnupamPKher) November 28, 2022
नदाव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अभिनेता अनुपम खेर (anupam kher) यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. 'खोट्याची उंची कितीही उंच असली तरी सत्याच्या तुलनेत ते नेहमीच लहान असते...' असं ट्वीट त्यांनी केलं आहे. (Iffi Jury Head And Israeli Filmmaker Nadav Lapid Criticised Vivek Agnihotri Film The Kashmir Files and anupam kher ashok pandit oppose him)
हेही वाचा : Shreya Bugde ची 'गुडन्यूज' ऐकून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना
‘द काश्मीर फाइल्स’ 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली. ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत होते. विवेक अग्निहोत्रींचा चित्रपट लोकांना आवडला, तर काहींनी त्यावर टीकाही केली होती. प्रकाश राज ते नाना पाटेकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका केली. या चित्रपटाचे वर्णन समाजात फूट पाडणारा म्हणूनही केले गेले.