इलियाना डिक्रुजनं शेअर केला बाळाचा नवा फोटो; अभिनेत्री झाली भावूक

ileana d'cruz baby photo: अभिनेत्री इलियाना डिक्रुज ही आपल्या हटके अभिनयासाठी आणि स्टाईलिंगसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे. तिनं नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्याचा नवा फोटो तिनं शेअर केला आहे.

गायत्री हसबनीस | Updated: Aug 9, 2023, 04:37 PM IST
इलियाना डिक्रुजनं शेअर केला बाळाचा नवा फोटो; अभिनेत्री झाली भावूक title=
August 9, 2023 | ileana dcruz shares her babys new photo on instagram fans reacts

ileana d'cruz baby photo: लोकप्रिय अभिनेत्री इलियाना डिक्रुज हिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तिनं नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तेव्हा सध्या तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता तिनं एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिचं गोंडस बाळाचा खुपच गोड फोटो शेअर केला आहे. यावेळी तिच्या बाळानं आपल्या हातानं आईची करंगळी पकडली आहे. त्यामुळे तिचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी तिनं हा फोटो पहिल्या सगळ्या फोटोंप्रमाणे ब्लॅक एण्ड व्हाईट शेडमध्ये शेअर केला आहे. हा फोटो तिनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे आणि तिनं एक स्टोरी शेअर केली आहे.

यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, आज माझ्या बाळाचा जन्म होऊन 1 आठवडा झाला आहे.' त्यामुळे तिच्या या फोटोंवर चाहत्यांचा तूफान वर्षाव होताना दिसतो आहे. इलियाना डिक्रुज हिनं 1 ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. इलियाना डिक्रुजनं गेली अनेक महिने आपल्या पतीची ओळख लपवून ठेवली होती. 

इलियाना डिक्रुज ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. काही काळ ती चित्रपटांपासून दूर होती. त्यातून तिन ओटीटीवरही पदार्पण केले होते. आपल्या गरोदरपणाच्या घोषणेच्या आधी तिनं 'बादशहा'सोबत एक म्युझिक व्हिडीओही शेअर केला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात तिनं आपल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. लग्नाआधी ती गरोदर झाली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलही केले जात होते. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्याआधी तिची आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या भावाच्या डेटिंगची चर्चा रंगलेली होती. सेबॅस्टियन कॅफेसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगलेल्या होत्या. 

हेही वाचा - फोटोत झीनत अमान यांच्यासोबत स्त्रीवेषात आहेत दिग्गज अभिनेते; ओळखू शकाल?

त्यानंतर अनेकदा तिच्या आणि त्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांचे कारण असे होते की कतरिनाच्या एका फॅमिली फोटोसोबत इलियानाचाही फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे या चर्चांना जोरात उधाण आलं होतं. आपल्या प्रेग्नंन्सीच्या घोषणेनंतर तिनं आपल्या पतीचे लपवलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे हा कोण आहे? याचीही चर्चा रंगलेली होती. 

त्यानंतर आपल्या बाळाच्या डिलिव्हरीच्या काही वेळाआधीच हा तिनं आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर केला होता. आता तिनं आपल्या बाळाची आणि पतीची ओळख रिव्हल केली आहे.