मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'इंशाअल्लाह' चित्रपटाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. या चित्रपटाच्या माध्यमातून तो आणि दिग्दर्शक संजय लिला भंसाळी तब्बल २० वर्षांनंतर एकत्र स्क्रिन शेअर करणार होते. एवढेचं नाही तर चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारणार होती. आलिया-सलमान एकत्र झळकणार म्हणून भाईजानच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
पण अखेर खुद्द सलमानने या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी नकार दिला आहे. २०व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात त्याने चित्रपटासंबंधीत खुलासा केला. चित्रपटाला नकार दिल्याचा त्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
'इंशाअल्लाह' बद्दल प्रश्न विचारण्यात आल्यानंतर आपण या चित्रपटात नसल्याचे त्याने सांगीतले आहे. 'इंशाअल्लाह' चित्रपट २०२० रोजी प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सलमानने नकार दिल्यानंतर अलिया भंसाळींसोबत चित्रपट साकाणार असल्याचे समोर येत आहे. परंतू अभिनेता कोण असेल याबद्दल अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
त्याचप्रमाणे, सलमान त्याच्या आगामी 'दबंग-३' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. वर्षाखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चित्रपटात मुख्य भूमेका साकारणार आहे. त्याचप्रमाणे अभिनेता दिग्दर्शक महेश मंजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर देखील या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणार आहे.