2019 मध्ये 10 Year Challenge ची हवा!

आपले १० वर्षे जुने फोटो आणि आताचे फोटो यामध्ये तुलना करणारा असा हा चॅलेंज आहे.

Shweta Walanj & Updated: Jan 17, 2019, 01:51 PM IST
2019 मध्ये 10 Year Challenge ची हवा! title=

मुंबई:आजच्या तरुणांना सतत काहीतरी हटके हवे असते. सध्या ट्रेण्डमध्ये आहे 10 Year Challenge अतिशय सोपे असे हे चॅलेंज आहे. आपले १० वर्षे जुने फोटो आणि आताचे फोटो यामध्ये तुलना करणारा असा हा चॅलेंज आहे. २०१८ मध्ये ‘किकी चॅलेंज’प्रसिध्द झाला होता. आणि २०१९ मध्ये 10 Year Challenge चे वारे वाहत आहेत. २००९ आणि २०१९ सालचे फोटो शेअर करुन झालेले बदल सकारात्मकरित्या स्वीकारण्याचा उद्देश या आव्हानामागे आहे. सामान्य जनता त्याचप्रमाणे  सेलिब्रिटींना या चॅलेंजची भुरळ पडली आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

10yearchallenge 23to33 from DELHI 6 to ek Ladki Ko Dekha toh AISA Laga.. do you think I got dads genes??? anilskapoor

A post shared by SonamKAhuja (@sonamkapoor) on

 अभिनेत्री सोनम कपूरने  10 Year Challenge स्वीकारले आहे. सोनमने स्वतःच्या इंन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन २ फोटोंचा कोलाज करुन फोटो शेअर केला आहे. सोनमने फोटोला 'दिल्ली ६ ते आताच्या सोनम पाहिले तर असे वाटते की मला माझ्या वडिलांकडून जीन मिळाले आहेत तुम्हाला असे वाटते का? असे कॅप्शन दिले. त्यावर आनंद आहूजाने 'हाहाहा शो ऑफ' अशी कमेंट दिली आहे.

 

 10 Year Challenge ला  क्रिकेटर मंडळींनी सुद्धा डोक्यावर घेतले आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेने स्वतःचे १० वर्षे जुने फोटो शेअर करत 'डोमेस्टिक पासून ते इंटरनॅशनलपर्यंत, एवढ्या वर्षात खूप काही शिकलो पुढेही शिकत राहिन, असे कॅप्शन दिले आहे.