Anupamaa मालिकेतील अभिनेत्रीला हार्ट अटॅक, सगळ्यांनाच मोठा धक्का

 तर या उत्सवादरम्यान

Updated: Nov 27, 2021, 12:03 PM IST
 Anupamaa  मालिकेतील अभिनेत्रीला हार्ट अटॅक, सगळ्यांनाच मोठा धक्का

मुंबई : 'अनुपमा' या टीव्ही मालिकेचे निर्माते त्यांच्या प्रेक्षकांना मनोरंजनाचा डोस देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. या मालिकेची कथा लिहिणारी टीम नवीन ट्विस्ट्स योजण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेते. यापूर्वी 'अनुपमा'मध्ये बाबूजींना हृदयविकाराचा झटका येणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

काही दिवसांनी बाबूजींना नाही, तर वनराजला हृदयविकाराचा झटका येणार असल्याचे ऐकू आले. या बातम्या समोर येताच अनुपमाच्या चाहत्यांमध्ये घबराट पसरली आहे. लोक विचार करू लागले की, आता कथा कशी वळण घेईल, पण थांबा, आता निर्मात्यांनी ही योजना देखील बदलली आहे.

अनुपमाला मोठा धक्का 

'अनुपमा'च्या आगामी एपिसोडमध्ये सर्व काही विसरून शाह कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणार असल्याचे तुम्हाला दिसेल. कुटुंबातील सदस्य मिळून बाबूजी आणि बा यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करतील. यादरम्यान शाह कुटुंबीय, अनुपमा आणि अनुज कपाडिया एकत्र खूप मस्ती करणार आहेत.

या मस्तीचं तणावात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. समोर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवला. तर या उत्सवादरम्यान बा यांना हृदयविकाराचा झटका येईल. शाह कुटुंबातील बा ही एकमेव अशी व्यक्ती आहे. जिच्या टोमण्यांनी ही अनुपमाला दिलासा मिळतो. अशा स्थितीत बा यांना अशा अवस्थेत पाहून अनुपमाला मोठा धक्का बसतो.