'दबंग 3' सिनेमात लागणार 'या' कलाकाराची वर्णी

'दबंग-3' सिनेमाच्या आयटम गाण्यावर करिना कपूर खान थिरकताना दिसणार आहे. सिनेमातील अनेक गोष्टींचा उलघडा हळू-हळू होत आहे. 

Updated: Feb 20, 2019, 06:34 PM IST
'दबंग 3' सिनेमात लागणार 'या' कलाकाराची वर्णी  title=

मुंबई: अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'दबंग-3' लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दबंग सिनेमाच्या दोन्ही भागांनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते.
सिनेमांच्या आयटम गाण्यांनी तर सगळ्यांच घायाळ केले होते. 'दबंग-3' सिनेमाच्या आयटम गाण्यावर करिना कपूर खान थिरकताना दिसणार आहे. सिनेमातील अनेक गोष्टींचा उलघडा हळू-हळू होत आहे. 

सिनेमात अभिनेता बॉबी देओल सलमानच्या मित्राच्या भूमिकेत झळकणार आहे. याआधी सलमान आणि बॉबी 'रेस 3' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्याच्या भेटीस आहे होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. 'रेस 3' सिनेमानंतर या दोघांचे मैत्रीचे नाते आधीकच फुलले.सिनेमाची शूटिंग मार्च महिन्यात सुरु होणार आहे. सिनमाचे सेट बनवण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.सिनेमाची निर्मिती अरबाज खान करणार आहेत.

Image result for bobby deol zee

2010 मध्ये सलमानचा 'दबंग' सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमातील सलमानच्या अभिनयाचे गोडवे जगभर पसरले होते. याच सिनेमाच्या दुसऱ्या भागाने सुद्धा चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. सलमान सध्या अली अब्बाज दिग्दर्शित 'भारत' सिनेमाचे काम पूर्ण करत आहे. त्यानंतर दबंग 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये तो व्यग्र असणार आहे. वर्षाअखेरीस यशाच्या उच्च शिखरावर असलेली रोहीत आणि सलमानची जोडी एकत्र काम करणार आहे.