Khatron Ke Khiladi मध्ये धोकादायक स्टंट, स्पर्धकाला गंभीर दुखापत

 दुखापतीनंतर वरुण सूद हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 

Updated: Aug 14, 2021, 01:31 PM IST
 Khatron Ke Khiladi मध्ये धोकादायक स्टंट, स्पर्धकाला गंभीर दुखापत title=

मुंबई : टेलिव्हिजनवरील स्टंटबाजीवरील आधारित रिअ‍ॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 11' च्या आगामी भागात स्पर्धक वरुण सूद, निक्की तांबोळी आणि अनुष्का सेन  काही अवघड स्टंट करताना दिसणार आहेत. शोमधील स्टंटची तयारी करताना वरुण सुदला दुखापत होते. दुखापतीनंतर वरुण सूद हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 

अशा परिस्थितीत वरुणचा मित्र आणि अभिनेता विशाल आदित्य सिंग त्याच्या वतीने स्टंट करायला तयार होतो. त्याचबरोबर वरुण सूद स्टंटसंदर्भात आपली बाजू  मांडतो. तो म्हणतो, "यात शंका नाही, स्टंट खरोखर कठीण होता आणि स्टंट सुरू होण्याआधीच मी गंभीर जखमी झालो, परिणामी इतर स्पर्धकांमध्ये खूप तणाव निर्माण  झाला."

 सर्वात धोकादायक स्टंट

या वीकेंडला होस्ट रोहित शेट्टी 'बेस्ट ऑफ स्टंट्स वीक' सादर करतो. हे पाहणे मनोरंजक असेल की निक्की आणि अनुष्का कामाची अडचण पाहता स्टंट करण्याचा  प्रयत्न करतील आणि मित्राला मदत केल्यामुळे विशाल स्वतःला अडचणीत आणेल का. हे देखील पाहणं तितकच रंजक ठरेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अनुष्का सेनसोबत चांगले संबंध

अनुष्का आता रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली आहे आणि सह-स्पर्धक विशेषतः वरुण सूद आणि विशाल आदित्य सिंग यांच्याशी तिचं चांगलं बॉण्डिंग दिसून येत आहे. ती  त्याला 'भैया' म्हणते आणि वरुणच्या घरी व्हर्च्युअल सॉकर खेळण्यात वेळ घालवते.