मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्याचा प्रत्येक चित्रपट पडद्यावर चमत्कार करतो आणि त्याच्या अभिनयाने प्रत्येक वेळी लोकांना वेड लावले आहे. अनेक सन्मानित पुरस्कारांनी राजकुमार राव याचा सन्मान या वर्षात झाला यातले अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावावर कोरून घेऊन अभिनेता राजकुमार राव याने एक वेगळा दर्जा निर्माण केला आहे. बी टाऊन मधला शेप लिस्टर अभिनेता म्हणून राजकुमार ची चर्चा सर्वत्र आहे आणि अश्यातच बधाई दो या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी बेस्ट अभिनेता म्हणून ब्लॅक लेडी त्याने पटकावली आहे.
फिल्मफेअर 2023 मध्ये राजकुमार याला बेस्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. विविध पुरस्कार पटकावत असताना त्याचा चाहत्याने त्याला " राजकुमार वाह " असं बोलायला सुरुवात केली आहे. अभिनयात कोणतीही कसर न सोडता उत्तम काम करण्यात राजकुमार बेस्ट आहे. अनेक दर्जेदार कथा वर सध्या तो काम करताना दिसतोय. सह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अनुभव सिन्हा यांच्या सोबत केलेला भीड सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि 2023 मध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली.
राजकुमारने नुकतंच स्त्री 2 ची रिलीजची तारीख घोषित केली. 2023 मध्ये राजकुमार अनेक नव्या विषयावर चित्रपट करणार असून "मिस्टर आणि मिसेस ,गन्स आणि गुलाब आणि श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक करणार आहे ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला.अभिनेता राजकुमार त्याच्या फिल्मी कारकिर्दीत खूप मेहनत केली आहे, बऱ्याचवेळा त्याला लूक्सवरुन टोमणे मारले जातात.
त्याचा जन्म 31 ऑगस्ट 1984 रोजी अहिरवाल, गुडगाव येथे झाला. पण सामान्य मुलाकडून अभिनेत्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. राजकुमारने त्याचा फल्मी कारकिर्दीत खूप संघर्ष केला आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या आत्माराम सनातन धर्म महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर, राजकुमारने चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठली.
एक काळ असा होता की, आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षकांनी दोन वर्षे त्यांची फी भरली होती. मुंबईत तो त्याच्या मित्राच्या दुचाकीवर ऑडिशनला जायचा. चांगलं दिसण्यासाठी काय घालावं हे देखील त्याला माहित नव्हतं. या सर्व गोष्टींची पर्वा न करता, राजकुमार त्याच्या चेहऱ्यावर गुलाबपाणी लावायचा आणि विचार करायचा की ते त्याला चांगले दिसेल. मात्र आज राजकुमार राव याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार पटकावले आहेत.