close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

के.एल. राहुल आणि सुनील शेट्टीच्या मुलीमध्ये फक्त मैत्री की आणखी काही?

आलियाच्या मैत्रीणीसोबतच्या नात्यामुळेही विश्वचषकादरम्यान राहुल चर्चेत होता

Updated: Jul 14, 2019, 12:11 PM IST
के.एल. राहुल आणि सुनील शेट्टीच्या मुलीमध्ये फक्त मैत्री की आणखी काही?

मुंबई : के.एल. राहुल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या क्रिकेटमधील कारकिर्दीमुळे नव्हे, तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल हा अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या मैत्रीणाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. ज्यानंतर आता मात्र त्याचं नाव एका वेगळ्याच मुलीशी जोडलं गेलं आहे. ती मुलगी आहे, बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी. 

सुनील शेट्टीची मुलगी आणि कलाविश्वातील नवोदित कलाकारांपैकी एक असणाऱी अथिया आणि राहुल हे एकमेकांचे खुप खास मित्र आहेत. पण, त्यांचं हे नातं मात्र मैत्रीपलीकडचं असल्याचं वृत्त आता समोर येत आहे. अथिया आणि राहुल एकमेकांना डेट करत असून, त्यांनी आतापर्यंत कुठेही या नात्याची माहिती बाहेर येऊ दिलेली नाही. त्यामुळे इतरांसाठी ते केवळ चांगले मित्रच आहेत. 

दरम्यान, या दोघांशीही निगडीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचं नातं हे निखळ मैत्रीचं असून, ते डेट करत नाहीत असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता नेमकं खरं काय, असाच प्रश्न अनेकांना पडत आहे. कलाविश्वातील एखाद्या चेहऱ्याशी नाव जोडलं जाण्याची राहुलची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अभिनेत्री निधी अग्रवाल आणि मॉडेल एलिक्झिर नाहर यांच्याशी त्याचं नाव जोडलं गेलं होतं. 

आलियाच्या मैत्रीणीसोबतच्या नात्यामुळे विश्वचषकादरम्यान चर्चेत होता राहुल 

आलिया भट्ट आणि अथियाची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूर हिच्यासोबतचे के.एल. राहुलचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  अंकित तिवारीसोबत 'तेरे दो नैना' या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकलेली ही सौंदर्यवती राहुलसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देत होती. जेवणापासून ते चित्रपट पाहायला जाण्यापर्यंत या दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. किंबहुना मुंबईत असतेवेळी राहुलला तिच्यासोबत माऊंट मेरी चर्चमध्येही पाहिलं गेलं होतं. ज्यामुळे ऐन विश्वचषकादरम्यान, त्यांच्या या मैत्रीला रिलेशनशिपच्या चर्चांची जोड मिळाली होती.