'इंडियन आयडल'च्या मंचावर आशा भोसलेंची ग्रॅण्ड एन्ट्री; स्पर्धकांना दिलं खास सरप्राईज

 'इंडियन आयडल 12'च्या या आठवड्याच्या शेवटी प्रसारित होणारा कार्यक्रम अगदी खास असणार आहे.

Updated: Jul 9, 2021, 03:12 PM IST
'इंडियन आयडल'च्या मंचावर आशा भोसलेंची ग्रॅण्ड एन्ट्री; स्पर्धकांना दिलं खास सरप्राईज

मुंबई :स्मॉल स्क्रिनवरील लोकप्रिय 'इंडियन आयडल 12 ' आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचलं आहे. लवकरच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडणार  आहे.त्यामुळे विजेतेपद कोण पटकावणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या ग्रँड फिनालेमध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, शनमुखा प्रिया, दानिश  मोहम्मद, निहाल तारो, आशिष कुलकर्णी या स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चांगलीच चुरस रंगणार आहे.दर आठवड्याला या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार आणि  मोठमोठे  सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि स्पर्धकांच मनोबल वाढवतात. 

'इंडियन आयडल 12'च्या या आठवड्याच्या शेवटी प्रसारित होणारा कार्यक्रम अगदी खास असणार आहे. कारण या मंचावर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एन्ट्री  होणार आहे. आशा भोसले यांचे या कार्यक्रमातील उपस्थिती केवळ स्पर्धकांसाठी नाही तर परीक्षकांसाठी देखील खास असणार आहे. या भागाचा व्हिडीओ समोर  आला आहे. केवळ इतकेच नाही तर या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या हस्ते इंडियन आयडल १२ स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण केले जाणार आहे.

आशाताई मंचावर हजर असताना स्पर्धक देखील एकापेक्षा एक परफॉर्मन्स सादर करणार आहे. आशाताईंची गाजलेली गाणी यावेळी सादर करण्यात येणार आहेत.  विजेत्याला मिळणारी ट्रॉफी आशाताईंनी रिवील केली आहे.

सोबतच ग्रँड फिनालेमध्ये संगीतक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार परीक्षक म्हणून सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले जुलैच्या अखेरीस प्रेक्षकांना पाहता  येणार आहे.