सोनू कक्करकडून सहदेवला मिळाली 'ही' ऑफर

'इंडियन आयडॉल 12'च्या मंचावर सोशल मीडियावर प्रसिद्ध बसपन का प्यार गाणं गायलेला सहदेव पोहोचला होता.

Updated: Aug 8, 2021, 10:55 PM IST
 सोनू कक्करकडून सहदेवला मिळाली 'ही' ऑफर title=

मुंबई : इंडियन आयडॉल 12चा शनिवारचा एपिसोड खूपच धमाल होता. करण जोहर शो मध्ये आला आणि या दरम्यान स्पर्धकांनी एकापेक्षा एक उत्तम परफॉर्मन्स दिले. शोच्या शेवटी, नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध बसपन का प्यार गाणं गायलेला सहदेव पोहोचला.

आदित्य नारायण सहदेवला आपल्या मांडीवर घेऊन स्टेजवर येतो. प्रत्येकजण सहदेवची स्तुती करतो आणि त्याच्या गाण्यावर नाचतो. यानंतर, अनु मलिक सहदेवला विचारतात की तो कसा प्रसिद्ध झाला आहे आणि आता त्याला काय वाटतंय, तर सहदेव म्हणतो, बरं वाटतं. लोकं माझ्यावर प्रेम करतात.

सहदेवचं बोलणं ऐकल्यावर सगळे हसायला लागतात. या दिवसात शोमध्ये पाहुणी जज म्हणून आलेली सोनू कक्कर सहदेवला सांगिते की, तिला त्याच्यासोबत फोटो क्लिक करायचा आहे. मग सगळे स्पर्धक आणि तीन जज सोनू, हिमेश रेशमिया आणि अनु मलिक स्टेजवर येतात. स्पर्धक आणि जज सहदेवसोबत त्यांच्या गाण्यावर नाचतात. करण जोहर देखील त्याच्या सीटवर बसून हा क्षण एन्जॉय करतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनू कक्कर आणि अनु मलिक त्यानंतर सहदेव सोबतचे फोटो क्लिक करतात. काही दिवसांपूर्वी आदित्य नारायणने सर्व स्पर्धकांसोबत सहदेवच्या 'बसपन का प्यार' या गाण्यावर एक व्हिडिओ बनवला होता, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.