मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवाल

Champions Trophy 2025 : आज शुक्रवारी पुन्हा एकदा आयसीसीची या संदर्भात बैठक होणार आहे. टीम इंडियाचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही यावर राजकीय नेत्याने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. 

पुजा पवार | Updated: Nov 29, 2024, 02:16 PM IST
मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवाल title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारताचा क्रिकेट संघ हा पाकिस्तानला जाणार नाही असे भारतीय क्रिकेट बोर्डाने आयसीसीला स्पष्ट केलं आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल पद्धतीने खेळवण्यात यावी असा प्रस्ताव आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर ठेवलाय. मात्र पीसीबी यासाठी तयार नाही. आज शुक्रवारी पुन्हा एकदा आयसीसीची या संदर्भात बैठक होणार आहे. टीम इंडिया (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही यावर आरजेडी नेता तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. 

माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेता तेजस्वी यादव हे माजी क्रिकेटर सुद्धा राहिलेले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सुरु असलेल्या वादावर तेजस्वी यादवला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तेजस्वी यादवने म्हटले की, खेळ आणि राजकारण याला एकत्र करणं योग्य नाही. तेजस्वीने प्रश्न केला की, 'क्रिकेट खेळण्यासाठी शेजारी देशामध्ये जाण्यास काय आपत्ती आहे? जर पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बिर्याणी खाण्यासाठी' पाकिस्तानला जाऊ शकतात, तर मग भारतीय क्रिकेट टीम ही एका महत्वाच्या स्पर्धेसाठी पाकिस्तानला का जाऊ शकत नाही'.  

हेही वाचा : Video : बहिणीच्या लग्नात पुष्पा 2 च्या गाण्यावर सूर्या भाऊचा भन्नाट Dance, पत्नीनंही दिली साथ

29  नोव्हेंबर रोजी आयसीसीने कार्यकारी सदस्यांची बैठक बोलावली. या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासंबंधित महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. परंतु यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी आयसीसीला स्पष्ट केलं की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान हायब्रीड मॉडलचा स्वीकार करणार नाही, तेव्हा आज होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याबाबत मोठी उत्सुकतात आहे. 

पाकिस्तान तयार झालं नाही तर काय? 

पाकिस्तान जर हायब्रीड मॉडेलला तयार झालं नाही तर आयसीसी पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पद काढून घेण्याची शक्यता आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासंदर्भात दक्षिण अफ्रीका आणि अमीरात क्रिकेट बोर्ड यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे अशी माहिती मिळतेय. आयसीसीने आधीच पीसीबीला स्पष्ट केले आहे की, भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होऊ शकत नाही, कारण त्यामुळे आयसीसीचे नुकसान होणार आहे. भारताला स्पर्धेतून काढून टाकल्यास पाकिस्तानचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. पाकिस्तानची प्रतिमा तसेच कोट्यवधी डॉलर्स पणाला लागल्याने परस्पर तडजोड हाच याबाबत एकमेव उपाय ठरू शकतो.