'त्या' चित्रपटावरील प्रेमापोटी रेस्तरॉचं नाव ठेवलं...

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अतिशय रंजक अशी माहिती समोर आली आहे. 

Updated: Sep 24, 2018, 05:48 PM IST
'त्या' चित्रपटावरील प्रेमापोटी रेस्तरॉचं नाव ठेवलं... title=

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'नमस्ते लंडन' या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. अशा या चित्रपटाची लोकप्रियता पाहता त्याचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. सध्याच्या घडीला याच चित्रपटाशी निगडीत अतिशय रंजक अशी माहिती समोर आली आहे. 

लंडनमध्ये एका व्यक्तीने त्याच्या भारतीय चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रेस्तरॉचं नाव परिणीती आणि अर्जुनच्या आगामी 'नमस्ते इंग्लंड' या चित्रपटावरुन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केल्याचं कळत आहे. 

'नमस्ते लंडन' या चित्रपटाच्या वेळीसुद्धा त्यांनी आपल्या रेस्तरॉचं नावही 'नमस्ते लंडन'च ठेवलं होतं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नमस्ते लंडन'नंतर त्या रेस्तरॉचे मालक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांशी संपर्क साधत चित्रीकरणादरम्यान वापरण्यात आलेलं मोजकं साहित्य, कलाकारांचे कॉस्च्युम रेस्तरॉमध्ये ठेवण्यासाठी देण्यात यावेत अशी विनंतीही केल्याचं कळत आहे. 

चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहेच. पण, एखाद्या चित्रपटाविषयी किंवा कलाकारांविषयी चाहत्यांचं असणारं प्रेम नेमकं काय असतं याचंही हे एक उदाहरण आहे, असंच म्हणावं लागेल. विपुल अमृतलाल शहा दिग्दर्शित 'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.