Video : सपना चौधरीच्या डान्स परफॉर्मन्समध्ये घुसला मुलगा

पाहा हा व्हिडिओ 

Video : सपना चौधरीच्या डान्स परफॉर्मन्समध्ये घुसला मुलगा  title=

मुंबई : हरियाणवी डान्सर सपना चौधरीचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत. कायम ती सोशल मीडियावर आपल्या डान्समुळे चर्चेत असते. हे व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. पण आताचा व्हिडिओ व्हायरल होतोय तो सपनामुळे नाही तर तिच्यासोबत स्टेजवर डान्स करणाऱ्या लहान मुलामुळे चर्चेत आला आहे. 

सपना बिग बॉसच्या 11 व्या सिझननंतर अनेक स्टेज शोमध्ये दिसली. त्यानंतर आता ती हिंदी - भोजपुरी सिनेमांत काम करताना दिसणार आहे. सपनाचा आता व्हायरल झालेला हा व्हिडिओ जुना आहे. डान्स परफॉर्मन्स सुरू असताना अचानक एक मुलगा तिच्यासमोर नाचू लागला. सपनाचे बॉडी गार्ड लगेच तिथे आले. पण हा मुलगा इतका गोड आहे की सपनाने त्याला रोखू नका सांगून स्टेजवर येऊ दिलं. 

सपना चौधरी लवकरच बॉलिवूड, पंजाब आणि भोजपुरी सिनेमांमध्ये डान्सिंग नंबरवर ठेका धरताना दिसली आहे. तसेच 'दोस्ती के साइड इफेक्ट्स' या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात विक्रांत आनंद, टीव्ही अभिनेता जुबैर खान आणि कसोटी जिंदगी की फेम अंजू जाधवसोबत दिसणार आहे.