मुलांसोबतच अश्लील फिल्म्स पाहते कारण...; सेलिब्रिटीच्या वक्तव्यानं हडबडले Fans

प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं, की त्यांच्या मुलांना कोणत्याही वाईट सवयी लागू नयेत. बऱ्याचदा असं होतं, की आईवडिलांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांची मुलं ज्या मार्गाला जायची ती जातातच.

Updated: Oct 7, 2022, 12:07 PM IST
मुलांसोबतच अश्लील फिल्म्स पाहते कारण...; सेलिब्रिटीच्या वक्तव्यानं  हडबडले Fans  title=
indonesian popstar wahyu setyaning on watching adult films with kids

Viral News : प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं, की त्यांच्या मुलांना कोणत्याही वाईट सवयी लागू नयेत. बऱ्याचदा असं होतं, की आईवडिलांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांची मुलं ज्या मार्गाला जायची ती जातातच. अश्लील चित्रपट, बोल्ड दृश्यांच्या बाबतीतही पालक बरेच सतर्क असतात. मुलं ठराविक वयात येण्यापूर्वी त्यांच्यासमोर अशा दृश्यांची वाच्यताही अनेकदा टाळली जाते. पण, एक सेलिब्रिटी मात्र सध्या चर्चेता विषय ठरत आहे की याच अश्लील चित्रपटांच्या विषयामुळे. (indonesian popstar wahyu setyaning on watching adult films with kids)

49 वर्षीय वाहु सेतयानिंग बुडी असं या सेलिब्रिटीचं नाव. इंडोनियन पॉपस्टार अशीच तिची ओळख. बऱ्याच सुपरहिट गाण्यांमुळं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या वाहुनं नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये खासगी आयुष्याशी संबंधित बऱ्याच गोष्टींवरून तिनं पडदा उचलला. मुलांचं अडल्ट फिल्म्स (Adult Films) पाहणं टाळता येणं जवळपास अशक्य असल्याचं तिनं म्हटलं. 

अनेकदा जेव्हा आई- वडील मुलांना असं करताना पाहतात तेव्हा त्यांना रागे भरतात, ज्यानंतर मुलं खोटं बोलण्याची सुरुवात करतात असंही ती म्हणाली. मुलांना आपण स्वत: असे चित्रपट, अशा फिल्म्स पाहण्याची परवानगी दिल्याचं सांगत त्यांच्याशी लैंगिक शिक्षणाविषयी (Sex Education) खुलेपणानं संवाद साधत असल्याचंही तिनं सांगितलं. 

अधिक वाचा : Adipurush ला 'मनसे' पाठिंबा; अमेय खोपकर जे म्हणालेत ते तुम्हाला पटतंय का?

मुलांसोबत मोकळेपणानं बऱ्याच मुद्द्यांवर बोलणाऱ्या या पॉप स्टारनं आपण त्यांच्यासोबत बसून अडल्ट फिल्म्स पाहिल्याचंही तिनं सांगितलं. मुलांच्या आयुष्यात आपण कधीच ढवळाढवळ करत नाही, असं सांगत त्यांच्याकडे एखादी आक्षेपार्ह गोष्ट आढळल्यास कधीच रागे भरत नाही असंही तिनं स्पष्ट केलं. 

मुलांसोबत Adult films पाहणं गरजेचं नाही, पण त्यांच्यासोबत लैंगिक शिक्षणाविषयी बोलणं महत्त्वाचं आहे हा मुद्दा तिनं मुलाखतीदरम्यान उचलून धरला. पॉप स्टार मोकळेपणानं हे सगळं बोलली खरं. पण, तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांनीच टीकेची झोड उठवली. 

मुलांना काही गोष्टी शिकवण्याचे वेगळे मार्गही आहेत, त्यासाठी त्यांच्यासोबत बसून अश्लील चित्रपट पाहण्याची गरज नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर सणसणीत टिकेची झोड उठवली.