Instagram Post Mocking Ananya Panday Aditya Roy Kapur Relationship: एकेकाळी मनोरंजनसृष्टी गाजावणारा विनोदी अभिनेता चंकी पांडे सध्या चर्चेत आहे. इंटरनेटवरील एका दाव्यानुसार चंकी पांडेने त्याची मुलगी तसेच अभिनेत्री अनन्या पांडेच्या काही काळात संपुष्टात आलेल्या नात्याबद्दल सूचक विधान केलं आहे. अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांचं नातं अल्पकाळ टीकलं. याच नात्यावर आता चंकी पांडे सोशल मिडीयावरुन व्यक्त झाल्याचं सांगितलं जात आहे. अनन्या आणि आदित्य यांनी मार्च 2024 मध्ये एकमेकांबरोबर असलेलं नातं संपुष्टात असल्याचं प्रसारमाध्यमांच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. अनन्या आणि आदित्य या दोघांनी आपलं हे कथित नातं स्वीकारलंही नाही आणि नाकारलंही नाही. मात्र अनेक ठिकाणी हे दोघे एकत्र दिसायचे. अनेक परदेशवाऱ्यांवर हे दोघे एकत्र दिसून आले आहेत. मात्र या दोघाचं नातं संपुष्टात आल्यानंतर जवळपास आठ महिन्यांनी अनन्याचे वडील यावर व्यक्त झाले आहेत.
इन्स्टाग्रामवर फिल्मी मौज नावाचं एक पेज आहे. या पेजवर एका चष्म्याच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीमधील अनन्या आणि आदित्य या दोघांचा एका जाहिरातीमधील फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोवर, "जेव्हा ब्रॅण्डबरोबरचा करार हा नात्यापेक्षा अधिक काळ टीकतो," असं खोचक वाक्य लिहिलेलं आहे. या पोस्टचा स्क्रीनशॉट रेडईटवर बॉली ब्राइंड एन गॉसीप नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
या स्क्रीनशॉटमध्ये चंकी पांडेने ही पोस्ट लाईक केल्याचं दिसत आहे. आपल्याच मुलीच्या नातेसंबंधांवर तिसरट भाष्य करणारी ही पोस्ट चंकीने खरंच लाईक केली की चुकून लाईक झाली याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवता याबद्दल विचारल्यास चंकी पांडे त्याच्या खास शैलीमध्ये, 'आयएम जोकिंग' असं म्हणू शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. अनेकांनी हे चंकी पांडेने नेमकं का लाईक केलं असेल असा प्रश्न उपस्थित केला आहे. काहींनी चंकीला या लाईकसाठी कूल डॅड असं म्हटलं आहे.

दरम्यान, या कथित ब्रेकअपनंतर अनन्या ही अमेरिकेतील वॉकर ब्लँको या मॉडेलबरोबर अनंत अंबानी आणि राधिक मार्चंडच्या विवाह सोहळ्यात दिसून आली. या मॉडेलने आधी अनन्याबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं नसलं तरी तिने मध्यंतरी परिधान केलेल्या एका लॉकेटवर AW अशी अद्यक्षरे असल्याने या दोघांमधील नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं चाहत्यांचं म्हणणं होतं. अनन्याच्या 26 व्या वाढदिवसाच्या दिवशी वॉकरने अनन्याचा एक फोटो शेअर करत, "वाढदिवसाच्या शुभेच्छा सुंदर मुली, तू फार खास आहेस. आय लव्ह यू," अशी कॅप्शन देत नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं.
सध्या आदित्य 'मेट्रो इन डायनो' नावाचा चित्रपट सारा अली खानबरोबर करत आहे. तर अनन्या सध्या सी शंकर नायर यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि आर. माधवनबरोबर काम करत आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.