Mrunal Divekar : लोकप्रिय सोशल मीडिया स्टार्सपैकी एक म्हणजे मृणाल दिवेकर. मृणाल दिवेकरला कोणी ओळखत नसेल असं शक्य नाही. मृणालनं आजवर अनेक वेगवेगळे रिल्स करत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यात तिचं रणबीर आणि आलियाच्या लग्नावरचा व्हिडीओ ते सीमा आणि सचिनचा व्हिडीओ... सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तिचे भन्नाट व्हिडीओ आपण नेहमीच सोशल मीडियावर पाहत असतो. मृणाल आपल्याला नेहमीच वेगवेगळं कॉन्टेट देताना दिसते. दरम्यान, मृणाल आता तिच्या रीलमुळे नाही तर तिच्या एका खासगी आयुष्यातील खुलाशानं वेधलं आहे. मृणालनं खूप मोठा धक्का दायक खुलासा केला आहे. मृणालनं सांगितलं की तिच्या एका ट्युशन टिचरनं नग्न केलं होतं.
गप्पा मस्ती पॉडकास्ट’ ला मृणालनं ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मृणालनं खुलासा केला की तिला एका ट्युशन टिचरनं नग्न केलं होतं. मृणाल म्हणाली की 'माझ्या एका ट्युशन टिचरने मी गृहपाठ केला नव्हता म्हणून मला नग्न केलं होतं. त्यावेळी मी तिसरीत की चौथीत होते, माझं वय 9-10 वर्षे असेल. मी दोन-तीनवेळा गृहपाठ केला नव्हता, त्यामुळे त्यांनी असं केलं होतं.
पुढे शाळेतील एक किस्सा सांगत मृणाल म्हणाली 'मी आधी कराडच्या एका शाळेत शिकत होते, त्यानंतर मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. त्यामुळे दोन्ही शाळेतला फरक मला लवकर कळला. त्यामुळेच मला दोन्ही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या वागणुकीतला फरक कळला. मी कराडमध्ये होते तेव्हा तिथे मला खूप अडचणी आल्या होत्या. ते मला खूप तुच्छतेने वागवायचे. तिथले शिक्षक मारायचे, वाचता आलं नाही, गणित सोडवता आलं नाही तर ते खूप अपमान करायचे.'
पुढे इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्यानंतर कसं होतं याविषयी सांगताना मृणाल म्हणाली की 'तिथून मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. तिथे जी मुलं नाटक किंवा खेळात चांगली होती, त्यांचे एक वेगळे सेक्शन बनवले होते. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला जे जमतं ते करा, पण त्यात तुम्ही खूप चांगलं कराल याची खात्री करा, असं म्हणायचे.'
पुढे मृणाल म्हणाली, 'कौशल्ये विकसित करण्यात दोन्ही ठिकाणी फरक होता. एखाद्या मुलाला लिहायला, वाचायला नाही येत पण त्याच्यात दुसरे गुण असतील तर त्यात त्याला एक्सप्लोर करायला लावणं यात आपले शिक्षक व शिक्षण पद्धती कमी पडत आहे.'
हेही वाचा : 'मी पण गेलेलो सुपरहिट सिनेमा पाहायला, अर्ध्यातून बाहेर पडलो!' नानांचा निशाणा 'जवान' की 'गदर 2'?
पुढे शाळेतील वागणूकीवर मृणाल म्हणाली, 'लहान मुलांना सर्वांसमोर मारणं, त्यांचे कपडे काढणं, तोंडावर चिकटपट्टी लावणं या गोष्टींचे नंतर खूप आघात होतात. तणाव येतो, त्या मुलांना स्वतःवर शंका येते की मी चांगली आहे की नाही, मी हे चांगलं करतेय की नाही, लोक जज करतील का, असे अनेक विचार मनात येतात. जेव्हा या सगळ्या गोष्टी ते करत असतात तेव्हा शिक्षकांना याचे परिणाम माहीत नसतात, पण मुलांच्या मनावर या गोष्टींचे आघात बराच काळ राहतात.'