मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) यांची फ्रेंचाइजी रॉयल चॅलेंजर्स बंगलौर (Royal Challengers Bangalore) ने आयपीएल 2021 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनची चांगलीच बोली लागली. मोहम्मदची बेस प्राइज 20 लाख रुपयांची बोली लागली. आरसीबीमध्ये विराट कोहलीच्या टीममध्ये विकेटकीपरची जबाबदारी सांभाळत आहे. हाच मोहम्मद सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
केरळचा विकेटकिपर मोहम्मद अझरुद्दीनला साऊथची लोकप्रिय अभिनेत्री नयनतारासोबत डिनर डेटला जायचंय. महत्वाचं म्हणजे नयनतारा देखील केरळची आहे. 36 वर्षांच्या नयनताराने 70 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'दरबार' सिनेमात रजनीकांत याच्यासोबत काम केलं आहे. या सिनेमात तिने लिलीची भूमिका साकारली होती.
नयनतारा 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गजनी' सिनेमात चित्राची भूमिका साकारली होती. नयनतारा यावेळी अभिनेता विग्नेश शिवमला डेट करत होती. या अगोदर नयनतारा अभिनेता प्रभूदेवासोबत अनेक वर्षे लिव-इनमध्ये राहिली आहे.
27 वर्षांच्या अझरुद्दीनबद्दल बोलायचं झालं तर सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (Sayed Mushtaq Ali Trophy) टी 20 टूर्नामेंटमध्ये खूप छान प्रदर्शन केलं होतं. अझरुद्दीनने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत 13 जानेवारी 2021 मध्ये इतिहास रचला होता. टी 20 टूर्नामेंटच्या 11 वर्षांच्या इतिहास सर्वाधिक जलद गतीने शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.