मुंबई : नुकताच बॅकॉंगमध्ये यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात 'हिंदी मीडियम' या सिनेमासाठी अभिनेता इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. मात्र हा पुरस्कार स्वीकारायला तो स्वतः हजर नव्हता. इरफान न्यूरोइंडोक्राइन ट्यूमरशी सामना करत आहे. लंडनमध्ये इरफानवर उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भावनिक पत्रातून त्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली होती.
इरफान खानने ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आयफा आणि चाहत्यांचे इरफान खानने आभार मानले आहेत. 'हिदी मीडियम' या सिनेमात त्याने एका जागरूक पित्याची भूमिका साकारली आहे. त्याचं सार्यांनीच कौतुक केलं आहे. या सिनेमातून आपल्या शिक्षण व्यवस्थेवर उपहासात्मक टीका केली आहे.
Thank you to @IIFA and our audience who have been part for my journey #IIFA2018 https://t.co/GpxSmflkLx
— Irrfan (@irrfank) June 26, 2018
न्यूरोइंडोक्राइन ट्यूमर या एका दुर्मिळ प्रकारच्या कॅन्सरशी इरफान खान लढा देत आहे. लाखभरात हा आजार केवळ 5 लोकांमध्ये आढळतो. हा आजार वेदनादायी आहे मात्र मला यातून बाहेर पडायचंय, पुन्हा कामाला सुरूवात करायची आहे असे इरफानने काही दिवसांपूर्वी सांगितले आहे. 'कारवा' हा इरफानचा आगामी सिनेमा 3 ऑगस्ट 2018 ला प्रदर्शित होणार आहे.