'या' दिग्दर्शकासोबत डेब्यू करू शकते सुहाना?

कोण करणार सुहानाला लाँच

'या' दिग्दर्शकासोबत डेब्यू करू शकते सुहाना?

मुंबई : शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हळहळू ग्लॅमरस जगतात पाऊल ठेवत आहे. हल्लीच एका मॅगझीनच्या कव्हरपेजसाठी फोटोशूट केल्याची चर्चा आहे. यासोबत सुहानाच्या डेब्यू करण्याबाबत देखील चर्चा रंगली आहे. होणाऱ्या चर्चांवर विश्वास ठेवायचं झालं तर सुहाना खानला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी अनेक टॉपचे दिग्दर्शक प्रयत्नशील आहे. आपण अनेकदा ऐकलं आहे की, स्टार किड्सला लाँच करण्यात करण जोहर अग्रेसर असतो. आता काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

आपल्याला करण जोहर हा शाहरूख खानचा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे करण जोहरच शाहरूखची पहिली चॉईस आहे. शाहरूख खानची पत्नी गौरी खान मात्र काही दुसऱ्या दिग्दर्शकांचा विचार करत आहे. एवढंच काय तर संजय लीला भन्साळी आणि सुजॉय घोष देखील आपल्या सिनेमांमधून सुहानाला लाँच करण्याचा विचार करत आहेत. आता फक्त ही चर्चा आहे वेळेनुसार यावर शिक्कामोर्तब होईल आणि खरं नाव पुढे येईल. 

सुहाना तिच्या या फोटोशूटवरुन आता चांगलीच ट्रोल होतेय. बॉलीवुडच्या स्टारकन्येच्या यादीत आता एक नवे नाव समोर येतंय.... आणि हे नाव आहे खुद्द बॉलिवूडचा 'किंग' शाहरुखच्या राजकन्येचे... शाहरुखची मुलगी सुहाना खान ही सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स असलेली स्टारकन्या आहे. सुहाना आता ग्लॅमरच्या दुनियेत पदार्पण करतेय. वोग इंडियाच्या मुखपृष्ठावर सुहाना खान झळकली आहे. आपली पहिली व्यावसायिक असाईमेन्ट सुहानाने पार पाडलीय. पण सुहानाचं हे फोटो शूट वादात सापडलंय.