सुष्मिता सेन लवकरच अडकणार विवाहबंधनात?

सुष्मिता लवकरच रोहमन शॉलसह विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे

Updated: Jul 31, 2019, 06:43 PM IST
सुष्मिता सेन लवकरच अडकणार विवाहबंधनात? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल काही ना काही कारणाने चर्चेत असतात. आता मात्र दोघेही एका खास कारणासाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अरमेनियामध्ये सुट्ट्यांवरुन परतल्यानंतर सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 'वोग' मॅगझिनने दिलेल्या रिपोर्टनुसार, सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधानात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टेलिव्हिजन अभिनेत्री चारु असोपा विवाहबंधनात अडकले.

 
 
 
 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

रोहमनने, सुष्मिता सेनला लग्नासाठी प्रपोज केलं आणि सुष्मितानेही रोहमनला होकार दिला. त्यानंतर दोघांनीही आपल्या नात्याला अधिकृतपणे दुजोराही दिला. 

'वोग' मॅगजिनने दिलेल्या वृत्तानुसार, रोहमन आणि सुष्मिता या वर्षाच्या अखेरीस विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. मात्र रोहमन आणि सुष्मिता दोघांकडूनही लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

रोहमन आणि सुष्मिता सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत, त्यांचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करत असतात.