विक्की कौशल या अभिनेत्रीला करतोय डेट, जाणून घ्या लव्हस्टोरी

विक्की कौशलची लव्हस्टोरी 

विक्की कौशल या अभिनेत्रीला करतोय डेट, जाणून घ्या लव्हस्टोरी  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल सध्या भरपूर चर्चेत आहे. त्याच्या करिअरचा ग्राफ चांगलाच उंचावला आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'राजी' आणि राजकुमार हिरानी यांच्या 'संजू' या सिनेमांमधील विक्की कौशलच्या अभिनयाची चर्चा होत आहे. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. स्वतः फिल्म मेकर संजय लीला भन्साळी विक्की कौशलसोबत काम करण्यासाठी उत्सूक आहेत. तसेच विक्की कौशलकडे आता अनेक मोठ्या बॅनरचे सिनेमे देखील आहेत. विक्कीचं प्रोफेशनल करिअरप्रमाणेच खाजगी आयुष्य देखील चर्चेत आहे. कारण त्याच्या आयुष्यात 'लेडी लक'ची एन्ट्री झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विक्की कौशल सध्या टीव्ही होस्ट हरलीन सेठीला डेट करत आहे. विक्की कौशलच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, हरलीन आणि विक्कीची ओळख काही महिन्यांपूर्वी झाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरलीन आणि विक्कीची ओळख एक कॉमन फ्रेंड म्हणजे आनंद तिवारीकडून झाली आहे. अगदी भेटीच्या सुरूवातीपासूनच या दोघांना एकमेकांबद्दल स्पेशल वाटू लागले आहे.  

मात्र विक्की आणि हरलीन सध्या आपल्या नात्याबद्दल कुठेही घाईत दिसत नाही. दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कोणतीही माहिती सध्या दिलेली नाही. दोघं ही सध्या आपल्या करिअरमध्ये बिझी असून कामाकडे फोकस करत आहेत. विक्की कौशल सध्या सर्बियामध्ये असून 'उरी' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमांत तो एका सेनेच्या जवानाची भूमिका साकारत आहे. 2018 मध्ये विक्की कौशलचे एकूण 3 सिनेमे येत आहेत. त्यातील राझी आणि संजू हे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही सिनेमांमुळे विक्की कौशलची खूप प्रशंसा होत आहे. तर तिसरा सिनेमा 'मनमर्जिया' सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. या सिनेमांत तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन विक्की कौशलसोबत दिसणार आहे. 

तर हरलीन सेठी लवकरच एकता कपूरच्या शोमध्ये दिसणार आहे. एकता कपूरच्या वेब चॅनल अल्ट बालाजीवर 'ब्रोकेन' या शोमध्ये हरलीन दिसणार आहे. यामध्ये हरलीन आणि विक्रांत मेस्सी लीड रोलमध्ये दिसणार आहेत. हरलीन सेठी चॅनल डिस्कवरीच्या 'गबरू' शोमध्ये दिसली आहे.