'ही' बॉलिवूड अभिनेत्री आहे मनोहर जोशींची नात! विकी कौशलशी आहे खास कनेक्शन

Manohar Joshi - Vicky Kaushal connection : मनोहर जोशी आणि विकी कौशल यांचं काय आहे नक्की कनेक्शन एकदा पाहाच...

दिक्षा पाटील | Updated: Feb 23, 2024, 11:02 AM IST
'ही' बॉलिवूड अभिनेत्री आहे मनोहर जोशींची नात! विकी कौशलशी आहे खास कनेक्शन title=
(Photo Credit : Social Media)

Manohar Joshi - Vicky Kaushal connection : बॉलिवूड आणि राजकारण यांचे अनेक कनेक्शन आपण पाहतो. कलाकार आणि राजकारणी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात एकत्र स्पॉट होतात. अनेकांमध्ये तर घट्ट नात देखील पाहायला मिळतं, पण सध्या एक नातं चर्चेत आहे आणि ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं. त्या दोघांचं काय नातं आहे ते जाणून घेऊया. 

वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून आजवर अनेक कलाकारांनी त्यांची एक छाप सोडली. त्यापैकी एक अभिनेत्री आहे जिच्या नावाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे आणि ती म्हणजे शर्वरी वाघ. शर्वरी वाघ ही अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं खासगी आयुष्य. शर्वरी ही गेल्या काही काळापासून विकी कौशलचा भाऊ सनी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. ते दोघं अनेकदा एकत्र दिसतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शर्वरी वाघविषयी बोलायचे झाले तर तिचा जन्म 14 जून 1996 रोजी मुंबईत झाला. तिच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते मुंबईत एक प्रसिद्ध बिल्डर आहेत. तर तिची आई नम्रता आणि बहीण कस्तुरी हे दोघेही आर्किटेक्ट आहेत. तर शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. 

शर्वरीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं अभिनय क्षेत्रात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून 2015 मध्ये सुरुवात केली होती. तर हा चित्रपट कोणता होता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्या चित्रपटाचं नाव ‘प्यार का पंचनामा 2’ आहे. शर्वरी इथेच थांबली नाही तर त्यानंतर तिनं पुढे ‘बाजीराव मस्तानी’मध्ये आणि ‘सोनू के टीटू की स्विटी’ या चित्रपटासाठी देखील तिनं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.

हेही वाचा : दिव्या खोसलानं सोशल मीडियावरून काढलं पतीचं आडनाव, घटस्फोटाच्या चर्चा उडताच; कारण आलं समोर

त्यानंतर शर्वरीला एक अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिनं ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘सितारा के तारे’ या चित्रपटात दिसली. त्याशिवाय ती 'द फरगॉटन आर्मी - आझादी की जंग' या सीरिजमध्ये दिसली होती. याच सीरिजमध्ये सनी कौशल आणि शर्वरी वाघ पहिल्यांदा स्क्रिनवर दिसले होते. त्यामुळे हे दोघं जर खरंच रिलेशनशिपमध्ये असतील आणि पुढे ते लग्न बंधनात अडकले तर तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत विकी कौशलचं देखील एक नात तयार होणार आहे, कारण त्याच्या भाऊ हा वाघ कुटुंबाचा जावई असेल. मात्र, शर्वरी किंवा मग सनी या दोघांपैकी कोणीही अजून त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर दुजोरा दिलेला नाही.