या कारणासाठी अनन्या पांडेच्या घरी बुके घेऊन पोहचला ईशान खट्टर

चंकी पांडेची मुलगी आणि 'पती पत्नी और वो' फेम अभिनेत्री अनन्या पांडे या दिवसात चर्चेत आहे.

Updated: Oct 24, 2021, 12:50 PM IST
या कारणासाठी अनन्या पांडेच्या घरी बुके घेऊन पोहचला ईशान खट्टर

मुंबई : चंकी पांडेची मुलगी आणि 'पती पत्नी और वो' फेम अभिनेत्री अनन्या पांडे या दिवसात चर्चेत आहे. आजकाल ती ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीमुळे चर्चेत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत चौकशी केल्यानंतर, एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा मित्र बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर स्वतः अनन्याच्या घरी बुके घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्स ईशानला ट्रोल करत आहेत.

अनन्या पांडे गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर असून तिची सतत चौकशी सुरू आहे. तीन दिवस सतत चौकशी केल्यानंतर अनन्याचा खास मित्र ईशान खट्टर तिच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. व्हायरल भयानीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये इशान खट्टर फुलांच्या दुकानात पुष्पगुच्छ विकत घेताना दिसत आहे. हा पुष्पगुच्छ खरेदी केल्यानंतर ईशान त्याच्या कारमध्ये बसतो आणि त्यानंतर ईशानची कार अनन्याच्या इमारतीकडे जाताना दिसते.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी याला खरं प्रेम म्हटलं. त्याचबरोबर काहीजण हा व्हिडिओ पाहून ईशानची मजा घेत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'बोलायला गेला असेल माझं नाव नको घेवूल प्लिज'. तर एका यूजरने लिहिलं, 'फुले देऊन तु हेच सांगितलं असशील, कृपया माझं नाव एनसीबीला सांगू नको.' तर एका यूजरने लिहिले - 'याचं करिअरही नाहीये, एनसीबी जे संपवेल'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ईशान खट्टर आणि अनन्या पांडे 'खाली पीली' चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाल केली नाही. पण चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली. त्याचबोरबर, हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही खूप वेगाने बाहेर आल्या होत्या. मात्र, दोघांनीही आपण ऐकमेकांचे चांगले मित्र आहोत असं म्हटलं.