रागात अभिनेत्रीने लगावली Sunny Deol च्या कानशिलात

 या चित्रपटात त्याच्या विरुद्ध अभिनेत्री अमृता सिंग दिसली होती.

Updated: Oct 24, 2021, 12:22 PM IST
रागात अभिनेत्रीने लगावली Sunny Deol च्या कानशिलात

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणारे अभिनेते सनी देओल आज मोठ्या पडद्यापासून दूर असू शकतात, पण त्यांचे नाव आणि त्यांच्या कथा अनेकदा चर्चेत असतात. सनी देओलने 1984 मध्ये बेताब या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध अभिनेत्री अमृता सिंग दिसली होती.

आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या सनी देओलच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये 'घायल'चे नाव देखील समाविष्ट आहे. नंतर या चित्रपटाचा सिक्वेल 'घायल वन्स अगेन' देखील बनवण्यात आला. या चित्रपटात सोहा अली खानने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली.

sunny deol and soha ali khan

'घायल वन्स अगेन'मध्‍ये सनी देओल आणि सोहाला लोकांनी पसंती दिली होती, परंतु चित्रपटाच्या सेटवर असे काही घडले की सर्वजण थक्क झाले. या चित्रपटाच्या सेटवर सोहा अली खानने सनी देओलला थप्पड मारली होती आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना धक्का बसला होता.

वास्तविक, सोहा चित्रपटात मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका साकारत आहे आणि तिला एका दृश्यात सनीला कानाखाली मारावी लागली. या संदर्भात सोहाने सनी देओलला कानाखाली मारली, मात्र कानाखाली मारल्यानंतर लक्षात आलं ते गरजेपेक्षा जास्त होतं, हे पाहून लोकांना देखील आश्चर्य वाटलं.

असे म्हटले जाते की सोहासाठी हा अभिनयाचा एक भाग होता पण ती वास्तववादी दिसण्यासाठी तिने सनी देओलला जोरदार कानाखाली मारली. अभिनेत्री तिच्या पात्रात इतकी हरवली होती की सनीला त्याचा फटका सहन करावा लागला.