शाहरुख खानच्या या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण; फोटो पाहून चाहत्यांना धक्का

 आता या अभिनेत्रीचा चेहरा खूप बदलला आहे आणि ग्लॅमरच्या जगापासून ती खूप दूर गेली आहे. सुचित्राचे ताजे फोटो पाहून आता तिला ओळखणं सोपं नाही.

Updated: Jan 18, 2023, 08:51 PM IST
शाहरुख खानच्या या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण; फोटो पाहून चाहत्यांना धक्का  title=

मुंबई : शाहरुख खान स्टारर चित्रपट 'कभ हा, कभी ना', तुम्हाला आठवत असेल, या चित्रपटात शाहरुखसोबत दिसणारी निरागस आणि अतिशय सुंदर 'आयना' म्हणजेच सुचित्रा कृष्णमूर्तीला तुम्ही कसे विसरला. सुचित्राने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांना इतकं वेड लावलं आहे की, आजही तिचा चेहरा त्यांच्या मनात ताजा आहे. पण आता तिचा चेहरा खूप बदलला आहे आणि ग्लॅमरच्या जगापासून ती खूप दूर गेली आहे. सुचित्राचे ताजे फोटो पाहून आता तिला ओळखणं सोपं नाही.

तिला खरी ओळख मिळाली ती तिच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपट 'कभी हा कभी ना'मधून. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसलेल्या सुचित्राने आपल्या मनमोहक हास्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटातील 'आना मेरे प्यार को' हे गाणंही खूप गाजलं.  27 नोव्हेंबर 1975 रोजी जन्मलेल्या सुचित्राने वयाच्या अवघ्या 12-13 व्या वर्षी टीव्ही सीरियल 'चॅलेंज'मधून करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने मॉडेलिंगही केलं आणि साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुचित्रा गायनासोबतच अभिनयातही माहिर आहे. एका मुलाखतीदरम्यान सुचित्राने सांगितलं  की, तिला चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. तिने चित्रपटात काम करावं असं तिच्या कुटुंबीयांना वाटत नव्हतं. चित्रपटात काम करण्यासाठी तिला घर सोडावं लागलं. सुचित्राने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली. 

सुचित्राने 1997 मध्ये आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूरशी लग्न केलं. कुटुंबाशी भांडून बॉलिवूडमध्ये आलेल्या सुचित्राला लग्नानंतर करिअरमधून ब्रेक घ्यावा लागला, कारण शेखरलाही तिने चित्रपटात काम करावं असं वाटत नव्हतं. शेखर आणि सुचित्रा यांचा 2006 मध्ये घटस्फोट झाला या अभिनेत्रीला कावेरी नावाची मुलगी आहे. काही काळापूर्वी सुचित्रा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ शो गिल्टी माइंड्समध्ये दिसली होती.