Minissha Lamba चं वादग्रस्त वक्तव्य...म्हणाली, कतरिना कैफसोबत ठेवायचे होते प्रेमसंबंध?

Minissha Lamba Birthday: कतरिना कैफच्या सौंदर्यावर सगळेच जण घायाळ होत असतात. तिच्यासोबत ऑनस्क्रिन रॉमान्स करण्याची सगळ्यांनाच मनोमनं इच्छा असते. परंतु एका अभिनेत्रीनं चक्क कतरिनासोबत रॉमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

Updated: Jan 19, 2023, 11:52 AM IST
Minissha Lamba चं वादग्रस्त वक्तव्य...म्हणाली, कतरिना कैफसोबत ठेवायचे होते प्रेमसंबंध? title=

Minissha Lamba Birthday: कतरिना कैफच्या सौंदर्यावर सगळेच जण घायाळ होत असतात. तिच्यासोबत ऑनस्क्रिन रॉमान्स (Minisha Lamba Katrina Kaif) करण्याची सगळ्यांनाच मनोमनं इच्छा असते. परंतु एका अभिनेत्रीनं चक्क कतरिनासोबत रॉमान्स (Romance) करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कतरिना कैफ ही अशी अभिनेत्री आहे जिच्यासोबत काम करण्याची सगळ्यांचीच इच्छा असते त्याचबरोबर तिच्यासोबत रॉमान्स करायला मिळावा अशीही अनेक अभिनेत्यांची इच्छा असते. परंतु या अभिनेत्रीनं केलेलं असं वक्तव्य ऐकून सगळेच बुचकळ्यात पडले आहे. सध्या तिचं हे वक्तव्य सोशल मीडियावर खूपदा व्हायरल होतं आहे. यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड विश्वात (Bollywood Gossip) खळबळ माजली आहे. परंतु नक्की ती असं काय म्हणाली? 

या अभिनेत्रीचे नावं आहे मनिषा लांबा. मनिषा लांबानं रणबीर कपूरच्या बचना-ए-हसीनो (Bachchna - E - Hasnio) या चित्रपटातून काम केले होते. 2005 साली तिनं यहां या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर किडनॅप वेल डन अब्बा अशाही काही चित्रपटांतून तिनं भुमिका निभावल्या होत्या. परंतु मध्यंतरी तिनं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ज्यात ती म्हणाली होती की तिला कतरिना कैफसोबत रॉमान्स करायचा आहे. त्यावेळी तिच्या या वक्तव्यानं सगळीकडेच खळबळ माजवून दिली होती तिच्या अनेक चाहत्यांनी तिला सपोर्ट केला परंतु तिच्या या विधानावर अनेकांनी टीकाही केली होती. सध्या तिच्या या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा आहे. 

मनिषा लांबाचा यावेळी 38 वा वाढदिवस आहे. तिच्या या वाढदिवशी तिला तिच्या चाहत्यांनी अनेक शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याचसोबत तिचे काही जुने किस्सेही व्हायरल होत आहेत. त्यापैंकी एक किस्सा म्हणजे स्ट्रगलच्या काळात मिनिषा लांबानं चोरी केल्याचेही समोर आले होते. परंतु यात किती खरं आहे याबद्दल फारशी माहिती नाही. त्यातून आपल्या प्रेमात तिला तिच्या पार्टनरकडून धोकाही मिळाला होता. 

कतरिनाबद्दल काय म्हणाली मनिषा? 

फिल्मफेअर पुरस्कार(Filmfare Award) सोहळ्यात एकदा मनिषाला प्रश्न विचारण्यात आला होता की, तिला समलैंगिक विषयावर बेतलेला चित्रपट करायला आवडले का? त्यावेळी ती म्हणाली होती की, हो मला तसा चित्रपट करायला आवडेल आणि तसा चित्रपट करायचा असेल तर मला अभिनेत्री कतरिना कैफसोबत रॉमान्स करायला आवडेल असंही तिनं सांगितलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मनिषा लांबानं हिंदी मालिकांमधूनही कामं केली आहेत. ती सोशल मीडियावरही सक्रीय आहे. तिच्या फोटोंना तिचे चाहते कायमच लाईक करत असतात.