मुंबई : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्यात गेल्या एक वर्षापासून काहीतरी बिनसले होते. त्यामुळे अखेर दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. टायगर-दिशाच्या ब्रेकअपच्या बातमीवर अभिनेत्याचे वडील जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया आली आहे. (jackie shroff first reaction on disha patani and tiger shroff breckup news)
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या ब्रेकअपची बातमी बॉलीवूडमध्ये व्हायरल होत आहे. आता दोघांचे ब्रेकअप प्रत्यक्षात झाले की नाही, हे कळलेले नाही. मात्र दिशा-टायगरच्या ब्रेकअपच्या बातमीवर जॅकी श्रॉफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बॉम्बे टाईम्सशी संवाद साधताना, टायगर श्रॉफच्या वडिलांनी मुलाच्या ब्रेकअपच्या बातमीवर म्हटले की, ते (दिशा-टायगर) नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी त्यांना एकत्र हँग आउट करताना पाहिले आहे. पण मी काय माझ्या मुलाचं लव्ह लाईफ ट्रॅक करत नाही. पण मला वाटते की ते चांगले मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकमेकांसोबत वेळ घालवतात.
जॅकीने पुढे सांगितले की, हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे. त्यांनी स्वतःच याबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यांना एकत्र रहायचे आहे की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. ते एकमेकांशी सुसंगत आहेत की नाही? ही त्यांची प्रेमकहाणी आहे. माझी आणि माझ्या पत्नीसारखी आमची स्वतःची प्रेमकहाणी आहे. दिशासोबत आमचे चांगले समीकरण आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा ते बोलतात तेव्हा ते आनंदी दिसतात.
दिशाचे टायगरच्या कुटुंबाशी, विशेषत: त्याची आई आणि बहिणीशी चांगले संबंध आहेत. दिशा आणि टायगर गेल्या 6 वर्षांपासून डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. दिशा-टायगरच्या ब्रेकअपच्या बातमीत किती तथ्य आहे हे अजून तरी पूर्णपणे समोर आलेले नाही.