'तुझ्या शहजादा...', कार्तिक आर्यननं क्रितीसोबतच्या रिलेशनशिपला दिला दुजोरा?

कार्तिक आर्यननं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर झाली व्हायरल...

Updated: Jul 27, 2022, 07:52 PM IST
'तुझ्या शहजादा...', कार्तिक आर्यननं क्रितीसोबतच्या रिलेशनशिपला दिला दुजोरा?  title=

मुंबई : बॉलीवूडची परम सुंदरी क्रिती सेनन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रिती आज 27 जुलै रोजी तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आता तिचा कार्तिक आर्यनने तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कार्तिक क्रितीला केक भरवताना दिसत आहे. कार्तिकनं पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर क्रितीनं मल्टी कलर स्वेटशर्ट परिधान केलं आहे. हा फोटो शेअर करत कार्तिकनं खूप सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. हे कॅप्शन देत त्यानं स्वत: ला क्रितीचा शहजादा म्हटलं आहे. हे पाहिल्यानंतर कार्तिक आणि क्रिती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

क्रितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्तिकनं लिहिले की, 'मुलीने डायटं मोडलं नाही, फक्त माझ्यासाठी पोज दिली. परम सुंदरी तुझ्या शहजादाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' कार्तिक आर्यन 
आणि क्रितीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

कार्तिकं हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोला 10 लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. तर या फोटोवर कमेंट करत त्या दोघांनी लग्न करायला हवं असं म्हटलं आहे. दरम्यान, कार्तिक आणि क्रिती हे दोघेही लवकरच 'शहजादा' या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. 

दरम्यान कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपूरमलू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित धवन करत असून भूषण कुमार, कृष्ण कुमार, अल्लू अरविंद, एस राधा कृष्ण आणि अमन गिल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती यांच्यासोबतच मनीषा कोइराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.