जॅकी श्रॉफने शेअर केला त्याच्या सर्वात आवडत्या अभिनेत्रीचा फोटो!

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आजही आपल्या बिनधास्त स्वभावामुळे चाहत्यांच्या मनात घर करून आहे. त्याने एक काळ गाजवला. आता जॅकी कमी आणि निवडक सिनेमे करतो. पण त्याचा मुलगा टायगर सध्या इंडस्ट्रीत धमाके करतो आहे.

Amit Ingole Updated: Mar 13, 2018, 11:02 AM IST
जॅकी श्रॉफने शेअर केला त्याच्या सर्वात आवडत्या अभिनेत्रीचा फोटो! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आजही आपल्या बिनधास्त स्वभावामुळे चाहत्यांच्या मनात घर करून आहे. त्याने एक काळ गाजवला. आता जॅकी कमी आणि निवडक सिनेमे करतो. पण त्याचा मुलगा टायगर सध्या इंडस्ट्रीत धमाके करतो आहे.

जॅकी श्रॉफने त्याच्या काळात अनेक अभिनेत्रींसोबत कामे केली. त्यात सर्वच टॉपच्या अभिनेत्रींचा समावेश होता. पण त्याची फेव्हरेट अभिनेत्री कोण याचा खुलासा कधी त्याने केला नव्हता. अनेक मुलाखतींमध्येही त्याने या प्रश्नाला टाळले होते. पण आता हा खुलासा झाला आहे. 

जॅकीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत तो अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत दिसत आहे. ‘माझी सर्वात फेव्हरेट आभिनेत्री माधुरी दीक्षित’! असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलंय.

नुकत्याच एका कार्यक्रमात दोघे एकत्र आले होते. तेव्हाचा हा फोटो आहे. दोघांनीही अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली आहे.