सलमानच्या पार्टीवरून घरी परतताना 'या' अभिनेत्रीच्या कारला अपघात

रात्री उशीरा २.४५ वाजता वांद्रेच्या कार्टर रोडवर हा अपघात झाला.

Updated: May 12, 2018, 07:40 AM IST
सलमानच्या पार्टीवरून घरी परतताना 'या' अभिनेत्रीच्या कारला अपघात  title=

मुंबई : गुरूवारी रात्री सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 'रेस ३' च्या टीमसाठी पार्टी ठेवण्यात आली होती. पार्टी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस या पार्टीवरून घरी परतत असताना तिच्या कारला अपघात झाला. 'स्पॉटबॉय' ने दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशीरा २.४५ वाजता वांद्रेच्या कार्टर रोडवर हा अपघात झाला. जॅकलीनची कार आणि ऑटोरिक्षा समोरासमोर एकमेकांना ठोकले. या अपघातात कोणी जखमी झाले नाही. पण जॅकलीनच्या कारची हेडलाईट खराब झाली. अशी घटना घडल्याचा दुजोरा जॅकलीनने एका माध्यमाला दिला. आम्ही लवकरच अधिकृतपण घटनेबद्दल सविस्तर सांगू. आता सर्व ठिक आहे. पोलिस आले आणि प्रकरण सोडवल्याचेही तिने यावेळी सांगितले.

सलमानसोबत जोधपूरमध्ये 

शुक्रवारी जॅकलीन सलमानसोबत 'रेस ३' च्या शूट साठी जोधपुर गेली. या सिनेमात दोघांसोबत अनिल कपूर, बॉबी देओल आणि डेजी शाह देखील आहेत. रेमो डिसोजा हा सिनेमा दिग्दर्शित करीत आहे. या सिनेमात जॅकलीनचे अॅक्शनच्या भुमिकेत दिसेल. यासाठी ती दररोज दोन तास मिक्स्ड मार्शल आर्ट्सची ट्रेनिंग घेते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x