Jacqueline Fernandez ने हॉलिवूड अभिनेत्यासोबत रात्रभर दिले बोल्ड सीन, व्हिडीओ व्हायरल

जॅकलिनचा आतापर्यंतचा सर्वात हॉट सीन, व्हिडीओमुळे सर्वत्र एकच खळबळ  

Updated: Feb 12, 2022, 04:33 PM IST
Jacqueline Fernandez ने  हॉलिवूड अभिनेत्यासोबत रात्रभर दिले बोल्ड सीन, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस कायम तिच्या हॉट फिगर आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. जॅकलिन सध्याच्या घडीची आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून जॅकलिन प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि चाहत्यांच्या पसंतीस पडली. पण आता एका वेगळ्या कारणामुळे जॅकलिन चर्चेत आली आहे. 

आता जॅकलिनचा नवा अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. जॅकलिनचा लेटेस्ट म्युझिक व्हिडीओ 'मड मुड के' रिलीज होताच इंटरनेटवर हिट झाला आहे. या व्हिडीओमध्ये जॅकलिनचा आतापर्यंतचा सर्वात हॉट अवतार दिसत आहे.

व्हिडीओमध्ये जॅकलिन हॉलिवूड अभिनेता मिशेल मोरोन (Michele Morrone) सोबत दिसत आहे. गाणं जॅकलिनने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत कॅप्शनमध्ये, 'लवकर व्हिडिओ पहा आणि तुम्हाला कोणता भाग सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट कळवा.'

जॅकलिनच्या नव्या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, टोनी आणि नेहा कक्करने गाणं गायलं आहे. गाण्या शिवाय जॅकलिन  'अटॅक' आणि 'बच्चन पांडे' दोन सिमेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय तिने 'सर्कस' आणि 'राम सेतू'साठी शूटिंग पूर्ण केलं आहे.