मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या 'भूत पोलीस' सह-कलाकार अर्जुन कपूरसोबत टॉक शो दरम्यान सांगितलं की, सोशल मीडियावरील काही टीका तिला समजण्यासारख्या आहेत आणि त्यांना ती सकारात्मक रुपाने घेते. अर्जुनने 'बक बक विथ बाबा' नावाचा सोशल मीडिया चॅट शो सुरू केला आहे. ज्यात अभिनेते त्यांच्या इंडस्ट्रितील मित्र आणि कुटुंबियांशी बोलतील ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. या शोमध्ये जॅकलिन सहभागी झाली होती. तिच्यालोबत या चॅट शोमध्ये चर्चा करण्यात आली. जिथे तिने तिचा पहिला क्रश, तिचा फिटनेस प्रवास आणि ट्रोलर्सला कसं सामोरं जावं याबद्दल सगळं काही उघड केलं.
हे हॉलिवुड स्टार होते क्रश
अर्जुनला जॅकलीनने सांगितलं की, माझं पहिलं क्रश माझ्या शाळेत होता. पण मी त्याचं नाव सांगू शकत नाही. रोमियो एंड जूलियट', 'टायटॅनिक' आणि 'बॅकस्ट्रीट बॉयज' पाहिल्यानंतर मला लियोनार्डो डिकॅप्रियो देखील क्रश होता.
कधी केलं नव्हतं असं काम
जॅकलीन फर्नांडीसने पुढे म्हटलं की, ती कधीच ब्लाइंड डेटवर गेली नाहीये. तिने या चॅट शो मध्ये आपल्या फूड हॅबिटला घेवून देखील अनेक खुलासे केले आहेत
हॉरर कॉमेडीमध्ये चिरौंजीची भूमिका साकारणारे अर्जून कपूरने पुन्हा एक्ट्रेसला विचारलं की, फूड तुझ्यासाठी किती महत्वपूर्ण आहे? यावंर जॅकलीन म्हणाली की, ''नेहमीच फूडसोबत सेलिब्रेट करणं मी पसंत करते. जॅकी हे पण म्हणाली, जेव्हा मी २० वर्षांची होते तेव्हा मी जास्त फूडी झाले. मी एकटीच रहायचे त्यामुळे केक, आईसक्रीम, कुरकुरे अशा सगळ्या गोष्टी मी खायची.''