'पकडा नाही तर पळून जाईल', वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अभिनेत्री दिसली 'या' ठिकाणी

'पकडा नाही तर पळून जाईल' अभिनेत्रीवर तोंड लपवण्याची वेळ, बॉयफ्रेंडकडून कोट्यवधींचे गिफ्ट घेणं पडलं महागात   

Updated: Aug 23, 2022, 09:13 AM IST
'पकडा नाही तर पळून जाईल', वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अभिनेत्री दिसली 'या' ठिकाणी  title=

मुंबई : झगमगत्या विश्वात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी वादग्रस्त परिस्थितीचा सामना केला आहे. सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे अभिनेत्री  जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez). जॅकलिन फर्नांडिस सध्या ईडीच्या कारवाईमुळे वादात अडकली आहे. यात दरम्यान जॅकलिनला मुंबईत स्पॉट करण्यात आलं. सध्या जॅकलिनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कायम ग्लॅमरस लूकमुळे चाहत्यांना घायाळ करणारी जकलिन एका व्हिडीओमध्ये सध्या लूकमध्ये दिसत आहे. 

फसवणूक प्रकरणात नाव आल्यानंतर जॅकलिनला जुहू स्थित मुक्तेश्वर मंदिरात स्पॉट करण्यात आलं. अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाच्या साध्या सूटमध्ये दिसत आहे. जॅकलिन देवाचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडताना दिसत आहे. 

सध्या जॅकलिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओ अनेकांनी कमेंट करत अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये, 'पकडा नाही तर पळून जाईल 200 घेवून...' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

'हाऊसफुल' अभिनेत्री 200 कोटींहून अधिक रकमेच्या खंडणीच्या प्रकरणात महाठग सुकेश चंद्रशेखरला ताब्यात घेतल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या प्रकरणी जॅकलिनची यापूर्वीही अनेकदा चौकशी झाली आहे.

सुकेशसोबत जॅकलिन रिलेशनमध्ये? 
सुकेशने तो जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही केला होता, मात्र जॅकलिनच्या टीमने या गोष्टीला नकार दिला. गेल्या आठवड्यात, ईडीने या प्रकरणात जॅकलीनला आरोपी बनवल्यानंतर, तिच्या वकिलाने एका निवेदनात सांगितले की, जॅकलिनला अद्याप तक्रारीची अधिकृत प्रत मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.