मुंबई : जॅकलिन फर्नांडीज आपली प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत नेहमीच चर्चेत असते. तिचं सुकेशसोबत जोडलं गेलेल्या नावामुळे ती अनेकदा अडटणीतही आली आहे. तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. याविषयामुळे जॅकलिनने नुकतीच दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली. या संदर्भात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली आणि दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि मंडोली कारागृहाच्या अधीक्षकांना निर्देश मागितले, जिथे ठग सुकेश चंद्रशेखर न्यायालयीन कोठडीत आहे. सुकेशने लिहिलेल्या पत्राबाबत अभिनेत्रीने हे पाऊल उचलले आहे.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला आणि मंडोली कारागृहाच्या अधीक्षकांना जॅकलिन फर्नांडिसने नुकतंच कोणतेही मॅसेज किंवा पत्र बाहेर येऊ नये हे त्वरीत रोखावं यासाठी अभिनेत्रीने निर्देश मागितले आहेत. याचबरोबर जॅकलिनचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उल्लेख करणं बंद करावं अशी तिने मागणी केली आहे. याचबरोबर तिने तिच्या याचिकेत आरोप केला आहे की, सुकेश चंद्रशेखर अनेक इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत त्रासदायक पत्रांच्या अवांछित प्रसारात गुंतला आहे.
पुढे अभिनेत्री म्हणाली, एकदा मीडिया आऊटलेट्सव्दारे असं काही प्रकाशित केलं गेलं होतं. त्यामुळे एक चिंताजनक आणि त्रासदायक वातावरण तयार केलं गेलं. त्यांचं व्यापक प्रकाशनामुळे भीती आणि माझा छळ झाला, ज्याचा अर्जदाराच्या सुरक्षिततेवर आणि आरोग्यावर खोलवर परिणाम झाला.
ईओडब्ल्यूने आपल्या उत्तरात जॅकलिन फर्नांडिसच्या अर्जाचं समर्थन केलं आणि म्हटलं, 'असं आढळून आलं आहे की, आरोपी सुकेश चंद्रशेखरला सध्याच्या अर्जदाराच्या संबंधात मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध माध्यमांतून पत्रं पाठवण्याची सवय आहे, जी केवळ त्रासदायकच नाही तर उलट आहे. सध्याच्या अर्जदाराला थेट तो धमकावत आहे आणि तिच्या सामाजिक आणि व्यावसायिक कामावरही परिणाम होत आहे.
जॅकलीनने तिच्या याचिकेत म्हटलं आहे की, आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत तिचं याआधी कोणतंही संभाषण झालं नव्हतं आणि सध्याच आरोपीने जेव्हा गुन्हा केला त्याच काळात त्याच्याशी तिचं बोलणं सुरु झालं होतं. युक्तिवादाची दखल घेत, ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारी 2023 रोजी ठेवली आहे. त्यामुळे अशाप्रकारे, एका मुलीला किंवा अर्जदाराला धमकी देणं किंवा तिला छळणं अशा प्रकारचा गंभीर प्रकार तपास यंत्रणेसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदाराला आरोपीकडून जबरदस्ती किंवा त्रास दिला जात आहे किंवा तिला धमकावलं जात आहे.