'आमचं मोठं बजेट नाही'; नाना पाटेकरांचं चाहत्यांसाठी पत्र

Nana Patekar Ole Aale : नाना पाटेकर लवकरच 'आले ओले' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटूला येणार आहेत. त्यातच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 20, 2023, 05:39 PM IST
'आमचं मोठं बजेट नाही'; नाना पाटेकरांचं चाहत्यांसाठी पत्र title=
(Photo Credit : Social Media)

Nana Patekar Ole Aale : बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपली छाप सोडणारे लोकप्रिय मराठी अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नाना पाटेकर हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नाना पाटेकर यांचा अभिनय आणि त्यांचे चित्रपट हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. सध्या नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत नाना पाटेकर हे पत्र लिहिताना दिसत आहेत. आता ते का असं करतायत आणि कोणाला पत्र लिहित आहेत असा प्रश्न सगळ्यांना पडला असताना. नक्की त्या मागचं कारण काय हे जाणून घेऊया. 

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवनं  तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नाना पाटेकर हे सुरुवातीला प्रश्न लिहिताना दिसतात. त्यानंतर नाना पाटेकर म्हणतात की, 'माझ्या थोड्याफार अनुभवातून मला एक उमगलं आहे. आपलं आयुष्य हे गणितासारखं असतं. माणसांची बेरीज, आनंदाचा गुणाकार, दु:खाचा भागाकार आणि वेळेची वजाबाकी.... माझं आणि माझ्या मुलाचं समीकरण वेगळं आहे. त्याच्यासाठी मी लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाजक आणि माझ्यासाठी तो मसावी महत्तम साधारण विभाजक. माणसांनी आनंदात रहायचं, आनंद वाटत रहायचं, वर्तमान जगायचं. त्यानंतर ते पत्र दाखवत म्हणतात की पत्र लिहितोय तुम्हाला, कशासाठी माहितीये का? 5 तारखेला आमचा ओले आले सिनेमा येतोय. पब्लिसीटी चालू आहे. हिंदी सिनेमांसारखं आमचं मोठं बजेट नाही. जेवढं आहे, तेवढ्यात भागवायचं. आमची दिवळीसुद्दा कशी असते माहितीये का? मोटरसायकल आणायची सायलेन्सर काढायचा त्याच्या तीन लिटर पेट्रोल भरायचं किक मारायची आणि एक्सिलेटर देऊन तीन तास फटफट... झाली दिवळी. बजेट नाही! त्यामुळे मला सांगा तुम्हाला शेवटचं पत्र कधी आलं? नाही आठवत नाय भारत पोस्टकडून आलेलं पत्र म्हणजे आनंद आहे. पाच जानेवारीला ओले आले थिएटरमध्ये येत आहे. त्यासाठी कधीपासून एकटाच बसून पत्र लिहित आहे. नक्की या!'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'सगळ्यांनी मागे सरका'; भावाच्या बर्थ डे पार्टीत पापाराझींवर संतापला सलमान खान

दरम्यान, 'ओले आले' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात एका बापाची कहानी आहे. तर नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यांच्याशिवाय मकरंद अनासपुरे हे सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'ओले आले' हा चित्रपट 5 जानेवारी 2024 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.