देसी गर्लच्या अंदाजात झळकण्यासाठी जान्हवी सज्ज

अभिनेत्री जान्हवी कपूर देसी गर्लच्या अंदाजात झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Updated: Jul 8, 2019, 07:11 PM IST
देसी गर्लच्या अंदाजात झळकण्यासाठी जान्हवी सज्ज

मुंबई : 'धडक' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर देसी गर्लच्या अंदाजात झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. 'दोस्ताना' चित्रपटातील 'देसी गर्ल' या गाण्यामुळे अभिनेत्री प्रियांका चोप्रा चांगलीच चर्चेत आली होती. आता तिच्या जागी जान्हवी 'दोस्ताना २' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर योणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Peaches and cream 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या साडीवरील आकर्षक अंदाजातील फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. 'दोस्ताना' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये जान्हवी आणि अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटातील तिसरा चेहरा कोण याविषयीची उत्सुकता मात्र कायम आहे. 

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दोस्ताना' या चित्रपटातून समलैंगिंक संबंधांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. ज्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. त्याच्याच सिक्वलची तयारी 'धर्मा प्रो़डक्शन्स' निर्मिती संस्थेअंतर्गत सुरु आहे.