'रामावरही वनवासात जाण्याची वेळ आली होती'; 'या' अभिनेत्रीकडून राहुल गांधींचे समर्थन

अभिनेत्री महिका शर्मा हिने या सगळ्यात राहुल गांधी यांची बाजू उचलून धरली...

Updated: Jul 8, 2019, 06:46 PM IST
'रामावरही वनवासात जाण्याची वेळ आली होती'; 'या' अभिनेत्रीकडून राहुल गांधींचे समर्थन

मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राजकीय वर्तुळात याविषयी उलटसुलट चर्चा सुरु असताना आता बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही जणांनी याविषयी मत व्यक्त केले आहे. अभिनेत्री महिका शर्मा हिने या सगळ्यात राहुल गांधी यांची बाजू उचलून धरली आहे. 

तिने म्हटले आहे की, राजकरण हे फार वाईट आहे. राहुल गांधी यांच्यासारख्या भावनाप्रधान व्यक्तीलाही या घाणेरड्या राजकारणाला बळी पडावे लागले. या गोष्टीमुळे मी फार उदास आहे. मला माहिती आहे की, राहुल हे गांधी घराण्याचे वारस आहेत. त्यांच्या धमन्यांमध्ये गांधी घराण्याचं रक्त वाहत आहे. त्यामुळे घाणेरडे राजकारण न खेळता ते लवकरच महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारखे जिंकतील, असे महिकाने म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Why I'm in love with him because he makes people laugh and enjoy his crazy talks at times.. And that's what a king need to do.. प्रत्येक चेहरे पर मुस्कान एक राजा की जिम्मेदारी है! #loveinair #vote #meradeshmerimaa #rahulgandhi @rahulgandhi

A post shared by Mahika Sharma (@memahikasharma) on

श्रीराम आणि पांडवांनाही काही दिवस त्यांच्या साम्राज्यापासून दूर वनवासात जावे लागले होते. तिच गोष्ट राहुल यांच्याबाबतीत घडत आहे. मात्र, सत्याचा नेहमीच विजय होतो. मी या सगळ्यात राहुल गांधी यांच्या पाठिशी उभी आहे. राहुल काँग्रेस पक्षात असोत किंवा नसोत मला काही फरक पडत नाही. मी राहुल गांधी यांच्यावर कायम प्रेम करत राहणार, असेही महिकाने सांगितले. 

महिका शर्मा हिने यापूर्वीही राहुल यांच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली होती. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत, यासाठी तिने उपवासही ठेवला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, मी देशाच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करत असल्याचे महिकाने सांगितले होते.