close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जान्हवी कपूरचं रॅम्पवॉकवरही पदार्पण

 या फॅशनवीकच्या निमित्तानं जान्हवी कपूर पहिल्यांदाच रॅम्पवर उतरली. 

Updated: Aug 25, 2018, 02:35 PM IST
जान्हवी कपूरचं रॅम्पवॉकवरही पदार्पण

मुंबई : धडक चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या जान्हवी कपूरने आता रॅम्पवॉकवरही पदार्पण केले आहे. मुंबईत सुरु असलेल्या लॅक्मे फॅशन वीकच्या तिस-या दिवशी रॅम्पवर जान्हवी कपूरचा जलवा पाहायला मिळाला. या फॅशनवीकच्या निमित्तानं जान्हवी कपूर पहिल्यांदाच रॅम्पवर उतरली.

मराठमोळा फॅशन डिझायनर नचिकेत बर्वेच्या मिलेनियल महाराणी कलेक्शनसाठी ती शो स्टॉपर झाली होती. सुदंर फ्लोरल लेंहगा तिने परिधान केला होता.

धडक नंतर 'तख्त'

डिझाईन आणि फॅब्रिकमुळे जड हा पेहराव ट्रिप होईल अशी भिती सुरुवातीला वाटली मात्र  ड्रेस परिधान केल्यानंतर तो खूपच हलका वाटला, अशी भावना जान्हवीने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. धडक नंतर जान्हवीचा 'तख्त' हा सिनेमा येऊ घातला आहे.

करिश्मा कपूर, दिशा पटानी , शाहिद कपूर यांचाही जलवा यावेळी रम्पवर पाहायला मिळाला.