close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून ड्रायव्हरकडून जान्हवीला घ्यावे लागले उधार पैसे

पैसे न घेता घरा बाहेर पडलेल्या जान्हवीला अखेर ड्रायव्हरकडून पैसे उधार घ्यावे लागले. 

Updated: Aug 14, 2019, 02:46 PM IST
...म्हणून ड्रायव्हरकडून जान्हवीला घ्यावे लागले उधार पैसे

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जान्हवीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या जान्हवीचा एक मनस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. पैसे न घेता घरा बाहेर पडलेल्या जान्हवीला अखेर ड्रायव्हरकडून पैसे उधार घ्यावे लागले. 

जान्हवीच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. रस्त्यावर चालत असताना एक मुलगा तिच्या कारमागे आला. त्यानंतर पुस्तकं विकत घण्यासाठी तिच्याकडे विनंती करू लागला. जान्हवीने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. 

कारमध्ये बसल्यानंतर तिने तिच्या ड्रायव्हर कडून पैसे उधार घेतले आणि त्या मुलाला दिले. त्याचप्रमाणे त्या लहान मुलाला स्मितहास्य देखील दिले. हा भावनात्मक व्हिडिओ सोशल मीडियावर जोर धरत आहे. 

जान्हवी सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. येत्या काळात जान्हवी भारतीय वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारलेल्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शक करण जोहरच्या मल्टी स्टारर 'तख्त' चित्रपटामध्ये देखील झळकणार आहे. 

जान्हवी शिवाय आलिया भट्ट, रणवीर सिंग, करिना कपूर,विक्की कौशल, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.