जान्हवी-ईशानचे फिल्मफेअर मॅगझीनसाठी फोटोशूट

जान्हवी कपूर आणि ईशान कट्टरच्या धडक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.

Updated: Jul 26, 2018, 09:39 AM IST
जान्हवी-ईशानचे फिल्मफेअर मॅगझीनसाठी फोटोशूट title=

मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान कट्टरच्या धडक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. त्याचबरोबर जान्हवी-ईशानची फ्रेश जोडीही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. अनेक ठिकाणी एकत्र दिसणाऱ्या या जोडीने फिल्मफेअरच्या कव्हरपेजसाठी खास फोटोशूट केले.

धडक मधून प्रकाशझोतात आलेल्या या जोडीने फिल्मफेअरच्या ऑगस्ट महिन्याच्या आवृत्तीसाठी फोटोशूट केले आहे. यात दोघांचाही कूल अंदाज पाहायला मिळत आहे. त्यांचा हा अंदाजही प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

पाहा फोटो...

धडकमुळे जान्हवी-ईशानच्या करिअरला चांगलीच दिशा मिळेल, यात काही शंकाच नाही.