मुंबई : कलाकार नेहमीच विचार करून बोलताना दिसतात. पण काहीवेळा त्यांना कळतही नाही की त्यांच्या बोलण्यात काही चूक झाली आहे. त्यानंतर ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. यावेळी ट्रोलर्सच्या निशाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आहे. जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
यापूर्वी आलिया भट्टला 'कॉफी विथ करण' (koffee with karan)मध्ये भारताच्या राष्ट्रपतींचे नाव विचारण्यात आलं होतं तेव्हा तिने 'पृथ्वीराज चौहान' असं उत्तर दिलं होतं. त्यावेळी आलियासोबत वरुण धवणही तिथे उपस्थित होता आणि त्याने मनमोहन सिंग यांच नाव घेतलं. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे अनन्या पांडेने जेव्हा तिच्या 'स्ट्रगल'ची कहाणी सांगितली तेव्हाही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवत तिला ट्रोल केले होते. आता जान्हवी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.
एक मुलाखीतीत जान्हवीचा शाळेतील आवडता विषय कोणता? असा प्रश्न विचारला तेव्हा गणित हा विषय शिकून माणसाची बुध्दी मंद होते असं विधान करत जान्हवी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ही क्लिप सोशलमीडियावर व्हायरल होताच जान्हवीवर हसावं की रडावं हे तिच्या चाहत्यांना कळेना झालंय.
यावेळी मुलाखतीत जान्हवी म्हणाली, मला गणित विषय अजिबात आवडत नव्हता. मी फक्त इतिहास आणि साहित्य या विषयात रमले. गणिताचा मला कंटाळा यायचा. जेव्हा पासून माझ्या हातात कॅल्युकेटर आलंय मी गणित सोडवलच नाही. मी कशासाठी डोकं फोडून घ्यायचं. त्यामुळे गणित हे बुध्दीला मंद बनवतं. तर इतिहास किंवा साहित्य या विषयामुळे माणूस सभ्य होतो. जान्हवीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
एक नेटकरी म्हणाला की, 'आर्यभट्ट बोलत असतील तुझी बुद्धी तपासण्यासाठीच शुन्याचा शोध लावला होता.' असं म्हणत एकाने तिला सल्ला दिला आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, की 'जान्हवीची मुलाखत ऐकण्यापेक्षा शाहरूख किंवा सुष्मिता काय म्हणतेय ते बघूया.'
करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोच्या सातव्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर गप्पा मारायला आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यात दुजाभाव केल्याचा आरोप करणवर झाला होता. करणने जान्हवीला हॉट म्हटले होते तर साराच्या कुटुंबातील मतभेदावरून तिला बोल लावले होते. या शोमधील खेळ हरल्यानंतर जान्हवीला मिठी मारली पण साराला शुभेच्छा द्यायला तो विसरला.