Janhvi Kapoor Rhinoplasty Surgery: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. लव्ह लाईफसोबत आता ती प्लास्टिक सर्जरीमुळे देखील चर्चेत असते. जान्हवी नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्न सोहळ्यात दिसली. त्यावेळी तिथे एक डॉक्टर देखील होते. हे कोणतेही साधारण डॉक्टर नव्हते तर असं म्हटलं जातं की त्यांनीच जान्हवीची राइनोप्लास्टी केली आहे.
जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नाकाची सर्जरी. जेव्हापासून डॉक्टरांनी अशा प्रकारच्या एका पोस्टला लाईक केलं आहे, तेव्हापासून ते दोघे चर्चेत आले आहेत. असं देखील म्हटलं जातं की त्या डॉक्टरांनी किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो कर्दाशियन यांची देखील सर्जरी केली आहे.
डॉक्टर राज कनोडिया हे एक लोकप्रिय सर्जन आहेत. त्यांनी रेडिटवरील एका पोस्टला नुकतंच लाइक केलं. त्यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वाढले आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की त्यांनी जान्हवी कपूरची Rhinoplasty केली आहे. त्या आधी क्लो कर्दाशियननं देखील सांगितलं होतं की डॉक्टर कनोडिया यांनी तिच्या नाकाची सर्जरी केली आहे आणि किम कर्दाशियनचा देखील उपचार केला आहे.
खरंतर वाद या गोष्टीवर होत आहे की खरंच डॉक्टर कनोडिया यांनी HIPAA (हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी) या कायद्याचे उल्लंघन तर केले नाही ना. जे साधारणपणे असं असतं की डॉक्टर त्यांच्या रुग्णांच्या सहमतीशिवाय त्यांची माहिती शेअर करू शकत नाही.
हेही वाचा : Suniel Shetty Gifts Bungalow: लेकीला ब्रेक दिला म्हणून कास्टिंग डायरेक्टरला गिफ्ट केला बंगला!
दरम्यान, डॉक्टर राज कनोडिया अंबानींच्या लग्नात होते. क्लोने मान्य केलं आहे की त्यांनीच तिची राइनोप्लास्टी केली होती, तर त्याशिवाय त्यांनी लाइक केलेल्या रेडिट पोस्टवर असं म्हटलं आहे त्यांनी जान्हवी कपूरची राइनोप्लास्टी देखील केली होती. तर हे HIPAA चं उल्लंघन नाही का? काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की 'आता ते अशा डॉक्टरांवर कधीच विश्वास ठेऊ शकणार नाही, जे अशा प्रकारच्या पोस्टला लाईक करतात.' दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं की 'आता वकील तर्क लावतील की लाईकचा अर्थ असा नाही की त्यांनी या गोष्टीची पुष्टी केली.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'HIPAA अमेरिकेत उपचार करणाऱ्या अमेरिके बाहेरच्या लोकांसाठी आहे, पण जर जान्हवी कपूरनं संमतीपत्रावर स्वाक्षरी केली असेल तर त्याचे उल्लंघन होणार नाही.'