जान्हवीमुळे खुशी ट्रोल होता होता वाचली, पाहा व्हिडिओ

पाहा हा व्हिडिओ

 जान्हवीमुळे खुशी ट्रोल होता होता वाचली, पाहा व्हिडिओ title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीच्या अशा अचानक जाणाने त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट आलं. पण या संकटातून अभिनेत्री जान्हवी कपूरने स्वतःला खूप खंबीरपणे सांभाळलं. जान्हवीने श्रीदेवीच्या मागे आपली बहिण खुशी कपूरला खंबीर आधार दिला आणि ती तिची काळजी घेत आहे. हीच काळजी तिची एका भर कार्यक्रमात दिसली. 

जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघी बी टाऊनमधील टॉप स्टार डॉटर्स आहेत. जान्हवीने करण जोहरच्या 'धडक' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं तर खुशी अजून आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. असं असलं तरीही खुशी अनेकदा बॉलिवूडच्या पार्टी आणि कार्यक्रमात सहभागी होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Janhavi Kapoor And Khushi Kapoor at Manish Malhotra fashion show. #ifi #indianfilminformation #india #film #information #latest #bollywood #hollywood #janhvikapoor #khushikapoor #atmanishmalhotra #fashionshow #instadaily #instalike #instafollow #instagood #instagreat #instalove #instagram

A post shared by Indian Film Information (@indian_film_information) on

शुक्रवारी या दोघी बहिणी डिझाइनर मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये सहभागी झाल्या. यामध्ये खुशी कपूरची फजिती होणार होती. तिचा मेकअप खराब झाला होता. अशावेळी जान्हवी कपूरने ती वेळ खूप छान प्रकारे सांभाळली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आपल्याला या दोघींमधील बॉन्डिंग कायमच दिसलं आहे. आईच्या निधनानंतर एकमेकींसोबत राहून आधार देत असतात. जान्हवी अगदी मोठ्या बहिणीचं कर्तव्य पार करताना दिसते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x