जान्हवी कपूरने मल्टी कलरच्या ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट; Photo पाहून चाहते घायाळ

 सध्या जान्हवी कपूर तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गुड लक जेरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Updated: Jul 31, 2022, 11:57 PM IST
जान्हवी कपूरने मल्टी कलरच्या ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट;  Photo पाहून चाहते घायाळ title=

मुंबई : सध्या जान्हवी कपूर तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गुड लक जेरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूरचा हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. जो प्रेक्षकांना खूप आवडतोय. या चित्रपटातील जान्हवी कपूरच्या अभिनयाचे सगळेजण कौतुक करत आहेत. त्याचबरोबर जान्हवीचं नावही त्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सामील झालं आहे. 

जी सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणाऱ्यांपैकी एक आहे. ती रोज तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. या क्रमात जान्हवीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.  जे पाहून चाहते तिच्यावर घायाळ होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोंमध्ये जान्हवी लांब स्पॅगेटी मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसत आहे. जान्हवीने एकामागून एक असे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री जबरदस्त पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. त्याचबरोबर जान्हवीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिचे केस मोकळे सोडले आहेत. न्यूड मेकअप तिला अधिक ग्लॅमरस बनवत आहे.

फोटोशूटचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "#Jerry isn't so blue anymore ????". ". जान्हवीच्या या पोस्टला अल्पावधीतच 2 लाख 70 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ज्यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.