अरे बापरे ! जान्हवी कपूर दिसली चक्क कारच्या डिक्कीत

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच 'स्टार वी फूड' च्या सीझन 2 मध्ये पहिली सेलिब्रिटी पाहुणी म्हणून दिसणार आहे. 

Updated: Sep 8, 2021, 08:36 AM IST
अरे बापरे ! जान्हवी कपूर दिसली चक्क कारच्या डिक्कीत title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच 'स्टार वी फूड' च्या सीझन 2 मध्ये पहिली सेलिब्रिटी पाहुणी म्हणून दिसणार आहे. या दरम्यान, तिने स्वतःशी संबंधित अनेक मनोरंजक कथा शेअर केल्या आहेत. एक किस्सा शेअर करताना जान्हवी कपूरने सांगितले की, ती फोटोग्राफर्सपासून लपण्यासाठी तिच्या कारच्या डिक्कीमध्ये बसायची. या शोमध्ये जान्हवी कपूर तिच्या मित्रांसाठी कोरियन खाद्यपदार्थ बनवणार आहे. त्यांच्यासोबत एक प्रशिक्षित शेफ देखील दिसेल.

जेवण संपल्यावर जान्हवी कपूरची मैत्रीण आणि ट्रेनर नम्रता पुरोहितने तिला काही मनोरंजक किस्से सांगायला सांगितले. जान्हवीनेही हे मान्य केले. यामध्ये नम्रताने सांगितले की, एकदा जान्हवी कपूर जिमच्या बाहेर जात होती आणि फोटोग्राफर्सने तिचे फोटो काढू नये असे तिले वाटत होते. अशा परिस्थितीत ती गाडीच्या डिक्कीमध्ये लपली. यावर जान्हवी म्हणाली की प्रत्यक्षात तिला त्या दिवशी जिममध्ये यायचे नव्हते, तिला घरी थकवा जाणवत होता.

अभिनेत्रीच्या ट्रेनरने सांगितली संपूर्ण गोष्ट 

यावर नम्रता म्हणते की जान्हवीने मला सांगितले की नायमो, तुला माझी मदत करावी लागेल. माझे फोटो पापाराझींनी क्लिक करू नये. म्हणून आम्ही तिची कार दुसऱ्या बाजूला पाठवली आणि मला वाईट वाटत होते कारण बाहेर उभे असलेले सर्व पापाराझी खूप छान आहेत. पण जान्हवीसाठी अशी परिस्थिती होती जिथे ती पापाराझींसमोर आरामदायक वाटत नव्हती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

जेव्हा जान्हवीची कार दुसऱ्या बाजूला गेली, तेव्हा पापाराझींना वाटले की रिकामी कार गेली आहे. जान्हवी माझ्या गाडीत बसली आणि नंतर पाहिले की पापाराझी आमच्या मागे येत आहेत.

यावर जान्हवी म्हणाली की होय पापाराझींना त्या दिवशी वाईट वाटले असावे. ते हे काम त्याच्या उदरनिर्वाहासाठी करतो. ते सर्व दुचाकीवरून आमच्या मागे येत होते. त्यानंतर आम्हाला एका वाईट ठिकाणी थांबावे लागले आणि तुम्हाला माहीत आहे का मला किती वेळा माझ्या कारच्या डिक्कीमध्ये लपवावे लागले? खूप वेळा. माझ्या गाडीत नेहमी एक चादर असते. मी हे जाकीट वापरते जेव्हा मला कुठे जायचे असेल.