जान्हवी कपूरच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते.

Updated: Apr 23, 2022, 09:22 PM IST
जान्हवी कपूरच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा; पाहा फोटो title=

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते. ती जेव्हा तिचा कोणताही फोटो शेअर करते तेव्हा तो फोटो व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. आता जान्हवीने लेटेस्ट फोटोशूट केलं आहे. जे पाहून चाहत्यांचे हार्टबिट्स वाढले आहेत.

जान्हवीच्या फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ
जान्हवी कपूरने फिल्मफेअर मासिकासाठी फोटोशूट केलं आहे. ज्याची एक झलक तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. फोटोमध्ये जान्हवीने ब्रॅलेट घातलेला दिसत आहे. यासोबत तिने ट्राऊजर घातली आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. जमिनीवर पडलेल्या अवस्थेत तिने हा फोटो क्लिक केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

असा पुर्ण केला लूक 
अभिनेत्री जान्हवी कपूरचे मोकळे केस आणि कानातले झुमके तिला अधिक हॉट बनवत आहेत. कॅमेऱ्यासमोर बोल्ड पोज देत तिने फोटोशूट केलं आहे. तिच्या किलर लूकने इंटरनेटचं तापमान वाढलं आहे. जान्हवीच्या या फोटोंचं कमेंट सेक्शनमध्ये खूप कौतुक होत आहे.