फोटोशूट करताना जान्हवीने जे केलं ते पाहून सगळे पाहतच राहीले, व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.

Updated: Oct 23, 2021, 10:55 PM IST
फोटोशूट करताना जान्हवीने जे केलं ते पाहून सगळे पाहतच राहीले, व्हिडिओ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. जान्हवी कपूर तिच्या लूक आणि स्टाईलसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. जान्हवीही चाहत्यांना आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. दरम्यान, तिचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ तिच्या एका फोटोशूट दरम्यानचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जान्हवी फोटोशूट करत आहे आणि अचानक मध्येच ती डान्स करू लागते. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूरने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने 2 व्हिडिओ आणि 2 फोटो शेअर केले आहेत. या व्हिडीओसोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'मी वचन देते की, यापेक्षा काम करण सोपं आहे'. यासोबत, तिचे चाहते देखील तिच्या कामगिरीबद्दल उत्सुक झाले आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहीलं की, 'जान्हवी कपूर ऍक्टिव्ह मोड ऑन' तर दुसऱ्याने 'तू खूप खोडकर आहेस' असं लिहिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवी कपूर वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, जान्हवीने इशान खट्टरसोबत 'धडक' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. याचबरोबर तिचा 'रुही' हा हॉरर कॉमेडी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. आता जान्हवी कपूर लवकरच 'दोस्ताना 2' आणि 'गुड लक जेरी' मध्ये दिसणार आहे.